Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

फलटण येथे शिवजयंती उत्साहात : दोन मिरवणूका प्रथमच

टीम : धैर्य टाईम्स
दोन शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात १४४ कलम लागू केले होते.छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही उत्सव समितीनी मिरवणुका आणण्यास बंदी घालण्यात आली होती यामुळे शिवभक्तांमध्ये नाराजी होती.
फलटण प्रतिनिधी : धैर्य टाईम्स 

शहर आणि परिसरात घराघरांमध्ये शिवजयंती उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात पारंपरिक वाद्यात आणि भव्यदिव्य देखाव्यासहित मिरवणुका काढून साजरी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त फलटण तालुका शिवजयंती उत्सव समिती व फलटण तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने या दोन्ही उत्सव समितीनी शहरात दोन वेगवेगळ्या मार्गावरून मिरवणुका काढल्या. दरम्यान दोन जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात १४४ कलम लागू केले होते.छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही उत्सव समितीनी मिरवणुका आणण्यास बंदी घालण्यात आली होती यामुळे शिवभक्तांमध्ये नाराजी होती. शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्या भोवती आकर्षक सजावट करण्यात आली होती यावेळी तालुक्यातील सर्व स्तरातील व्यक्तींनी व नागरिकांनी छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्यास अभिवादन केले. शहर आणि परिसरात अनेकांनी आपापल्या घरीही शिवजयंती उत्साहात साजरी केली. यावेळी प्रत्येकाने आपल्या घरासमोर भगवे ध्वज लावले होते. 

फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीचे वतीने सकाळी ९ वाजता माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर यांनी झेंडा दाखवून बाइक रॅलीला सुरुवात केली. श्रीमंत संजीवराजे हे रॅलीत स्वतःही सहभागी झाले होते. मुधोजी क्लब माळजाई मंदिर रोड येथून सायंकाळी ७ वाजता आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक-निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत शिवभक्तांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला व मिरवणुकीला सुरुवात झाली. 

फलटण तालुका सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत शिवप्रेमींनी व हिंदुस्थान शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते क्रेनच्या साहाय्याने पाच नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक घातला. त्यानंतर दुपारी ३ वाजता दुचाकी रॅली काढण्यात आली. सायंकाळी ५ वाजता गजानन चौकातून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत मुली व महिलांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला व मिरवणुकीला सुरुवात झाली. 

या दोन्ही मिरवणुकीमध्ये डीजे, घोडे उंट, इतिहासातील ऐतिहासिक पात्रे, बैलगाडी संबळवादक, हलगी पथक, लेझिम पथक, केरळी वाद्य, महिला पुरुष झांज पथक, लेझर लाइट्स शो, भव्य देखावे, झेंडे घेतलेले मावळे, तुतारीवादक आदी वाद्यवृंदांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दरम्यान या मिरणुकीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. दोन्ही मिरवणुका पाहण्यासाठी फलटण तालुक्यातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. 

मिरवणूक बघण्यास आलेल्या अनेक महिला व मुलींना मोकाट जनावरांनी जखमी केल्याची घटना घडली एकंदरीत फलटण नगर परिषदेच्या मोकाट जनावरांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा फटका मिरवणूक बघण्यास आलेल्या सामान्या नागरीकांना यावेळी बसला.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER