फलटण प्रतिनिधी : क्राईम न्यूज
मौजे निंबळक येथे जुन्या भांडणाच्या कारणातून पती पत्नीस मारहाण केल्या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ५ रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास मौजे निंबळक ता. फलटण गावचे हद्दीत फिर्यादी शोभा सुरेश पवार (रा. निंबळक ता. फलटण) यांच्या घरासमोर फिर्यादी व फिर्यादीचा पती सुरेश पवार असे बसले असताना फिर्यादीचा दिर तपास्या आस्मान पवार व त्याची पत्नी जया तपास्या पवार यांनी जुन्या भांडणाचे कारणावरून फिर्यादीस व फिर्यादीचे पती सुरेश पवार यांना हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व तपास्या पवार याने फिर्यादीचे पती सुरेश पवार याचे कानाचे पाठीमागे बिअरची बाटली मारून जखमी केले. जया पवार हिने फिर्यादीस व फिर्यादीचे पती सुरेश पवार यांना दगडाने , विटेचे तुकड्याने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली अशी फिर्याद शोभा सुरेश पवार यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास पो हवा साबळे करीत आहेत.



















