Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त - राज्यव्यापी व्याख्यानसत्र : थिंक महाराष्ट्र डॉट कॉमचे आयोजन

टीम : धैर्य टाईम्स

‘वैचारिक घुसळण’ म्हणता येईल अशी एक वैशिष्ट्यपूर्ण व्याख्यानमाला भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सुरू करत आहोत. पंच्याहत्तर व्याख्याते तेवढ्याच व्याख्यानांतून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद 15 ऑगस्ट 2023 ते 30 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये साधतील असा हा प्रयत्न आहे. त्यासाठी विविध विषयांवरील अभ्यासू व्यक्तींनी व्याख्याने देण्यासाठी स्वेच्छेने पुढे यावे आणि महाविद्यालये व अन्य तरुण व्यासपीठे यांनी तशा व्याख्यानांचे संयोजन करण्यास सिद्ध व्हावे अशी विनंती आहे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेब पोर्टलचे ‘सद्भाणवनेचे व्यासपीठ’ (मुंबई), सामाजिक संस्था ‘स्वप्नभूमी’ (केरवाडी-परभणी), ‘विचारवेध’ (पुणे), ग्रंथालय मित्र मंडळ (ठाणे) आणि आरोग्य भान (पुणे) या पाच संस्थांच्या तर्फे हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

प्रगत तंत्रज्ञान, समाजमाध्यमांनी घडवलेली नवी जीवनशैली आणि कोरोना काळापासून बिघडलेली मानवी आयुष्याची एकूण घडी यांबाबत विचारमंथन व त्याद्वारा समाजजागृती हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. वाढलेले शिक्षण आणि पदव्या यांमुळे पैसे मिळवण्याची क्षमता बरीच आली आहे; पैसाही समाजात खुळखुळत आहे. मात्र वास्तव मनुष्य जीवनात सारी मूल्यव्यवस्थाच कसोटीला लागली आहे. जीवनशैली पर्यावरणानुकूल असावी ही जाणीव बऱ्यापैकी प्रसृत आहे. परंतु जीवनशैली प्रत्यक्षात कशी असावी आणि ती कशी अवतरेल याबद्दल चर्चेत नेमकेपणा आढळत नाही. त्यामुळे एकूण मानवी आयुष्यात, वर्तनात भरकटलेपणा आला आहे- विकृती वाढत आहेत.

उपक्रमात विविध विषयांतील तज्ज्ञ व्याख्याते विद्यार्थ्यांशी/तरुणांशी संवाद साधतील. नमुन्यासाठी म्हणून सध्या पुढील विषयक्षेत्रे नमूद करत आहोत. वक्ते पुढे काय तर्जुमा घेऊन येतात त्यावर बरेच अवलंबून आहे. विशेषत: अनुभवी, निवृत्त मंडळींनी व्याख्याने देण्यास पुढे यावे असे आग्रहाने सुचवत आहोत. स्फूर्तिदायक विषय, तरुणांपुढे असलेली आव्हाने, कायद्यांचे ज्ञान, तर्कशुद्ध विचार करण्याची सवय, जीवनकौशल्ये, पैसे मिळवण्याचे विधायक मार्ग- त्यासाठी असलेल्या संधी, तरुणांतील बलस्थाने शोधण्यास त्यांना मदत, पर्यावरणाची जबाबदारी, कलेचे स्थान आणि तिचे महत्त्व, सांस्कृतिक प्रभावाचे वातावरण, तरुणांमधील व्यसनाधीनता, ताणाचे नियोजन, वृद्धत्वकाळाची कसोटी, लग्न-नातेसंबंध... या आणि अशा अन्य सद्यकाळातील आव्हानात्मक विषयांतून वैचारिक घुसळणीसाठी चालना मिळू शकेल.

महाविद्यालयांना विनंती अशी, की त्यांनी त्यांच्या महाविद्यालयांत ऑगस्ट 2023 ते जानेवारी 2024 या सहा महिन्यांत स्वतंत्र भारताची पंच्याहत्तर वर्षे साजरी अमृतमहोत्सवी व्याख्याने योजून करावी. महाविद्यालयांची जबाबदारी अशी, की त्यांनी विद्यार्थ्यांना व्याख्यानांसाठी दीड तास मोकळे ठेवावे. संयोजक पाच संस्था व्याख्यानमालेचा उपक्रम स्वयंप्रेरणा आणि सामाजिक जबाबदारी या भावनेतून आणि स्वखर्चाने करत आहेत. तरीसुद्धा महाविद्यालयांनी व समाजातील मान्यवर व्यक्तींनी त्यांना शक्य होईल तसा खर्चातील वाटा उचलावा- त्यांच्यापैकी कोणी व्याख्यात्यांची त्यांच्या गावातील निवासव्यवस्था, भोजन असे आतिथ्य सांभाळावे. 

वक्ते म्हणून अनुभवी, कुशल व तज्ज्ञ व्यक्ती, विशेषतः सक्षम ज्येष्ठ नागरिक हे या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. त्यांच्याकडे असलेले ज्ञान, वेळ आणि पैसे यांची या उपक्रमाला गरज आहे. स्वातंत्र्य चळवळीत समाजातील सुशिक्षित लोक असेच संघटित झाले व प्रत्यक्ष कार्यात उतरले. सध्याच्या अनिश्चित काळातील हतबलता हटावी आणि वैचारिक घुसळण सुरू व्हावी अशी व्यापक अपेक्षा या व्याख्यानमालेच्या संयोजनामागे आहे. स्वयंस्फूर्तीने आपणास जे देणे शक्य आहे, त्याचे मनापासून स्वागत आहे. यामुळे या चळवळीला पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अपर्णा महाजन 98220 59678 इ मेल aparnavm@gmail.com

सुनिल जोशी 93226 42360 इमेल ssjoshiassociates@gmail.com

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER