फलटण प्रतिनिधी:-फलटण तालुक्यातील नागरिकांकरीता शासकीय योजनांची जत्रा अंतर्गत पुरवठा विभागातील खराब / जीर्ण / गहाळ शिधापत्रिका बदलून देणे, शिधापत्रिकेतील नांव कमी करणे, शिधापत्रिकेतील नांव समाविष्ठ करणे. वरील कामकाजासाठी दि. 18 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यत तहसिल कार्यालय फलटण (दरबार हॉल ) येथे शिबीराचे आयोजन केले आहे. तरी नागरिकांनी आपले परिपूर्ण प्रकरणांसह उपस्थित रहावे अशी माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप व तहसीलदार समीर यादव यांनी दिली आहे.
दुबार शिधापत्रिकेसाठी अर्ज, तलाठी यांचेकडील उत्पन्नाचा दाखला, रेशन दुकान दाखला, मूळ रेशनकार्ड, मूळ रेशनकार्ड हरविले असलेस पोलीस स्टेशन दाखला प्रतिज्ञापत्र (साध्या कागदावर प्रतिज्ञापत्र ) गहाळ झाले असल्यास तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांची आधारकार्ड झेरॉक्स ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
शिधापत्रिके मधील नाव कमी करण्यासाठी अर्ज, मुत्यू दाखला, लग्नपत्रिका ( मुलीचे लग्न झाले असल्यास) शिधापत्रिके मध्ये नाव वाढविणे, अर्ज, जन्म दाखला / बोनाफाईड, नाव कमी केल्याच दाखला (लग्न हून आल्यास),लग्नपत्रिका ही कागदपत्रे आवश्यक आहेत. शिधापत्रिके मधील नाव दुरुस्ती करण्याकरिता अर्ज, प्रतिज्ञापत्र, नावाचा पुरावा, गॅझेट ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

















