फलटण (प्रतिनिधी) –
बार्टी (BARTI) मार्फत घेण्यात आलेल्या एमपीएससी अराजपत्रित गट ब व क पदांसाठीच्या CET परीक्षेत शुभम अशोक मोरे यांनी राज्यात 204 वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती, पिंप्रद यांच्या वतीने त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्कार कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सेंट्रल वर्किंग कमिटी, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन (1029) चे शरद मोहन मोरे उपस्थित होते. तसेच जेष्ठ पत्रकार सचिन मोरे यांनीही उपस्थित राहून शुभम मोरे यांच्या यशाचे कौतुक केले.
यावेळी मान्यवरांनी बोलताना सांगितले की, बार्टीच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत परिश्रम व जिद्दीच्या जोरावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही स्पर्धा परीक्षांमध्ये मोठे यश मिळवू शकते, याचे उत्तम उदाहरण शुभम मोरे यांनी घालून दिले आहे.
कार्यक्रमात समितीच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










