फलटण तालुक्यातील ताथवडे येथे डसऱ्याक रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डराडो) संस्थेतर्फे कै. ॲड. धोंडीराम अर्जुना खरात (निवृत्त प्राचार्य) यांच्या ६ व्या पुण्यतिथी व ७६ व्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या निमित्ताने वन विभागाच्या क्षेत्रामध्ये शेकडो वृक्षांचे रोपण तसेच बीजरोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थ व स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमावेळी संस्थेच्या डायरेक्टर ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात व डॉ. महेशकुमार धोंडीराम खरात उपस्थित होते. तसेच वन विभागाचे वनरक्षक सुरज इंकर, वनसेवक गजाबा जाधव यांच्यासह संस्थेचे वॉलंटियर राजाराम अडसूळ, सुखदेव फुले, पंकज शिंदे, सनी नाळे, श्रीकांत गावडे, अशोक गावडे, वीरसेन सोनवणे, हिम्मतराव खरात तसेच ताथवडे गावातील जाधव, शिंदे व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असून, अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजामध्ये जनजागृती निर्माण होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.










