Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

डीजे व फटाके मुक्त भीम जयंती जिल्ह्यात आदर्शवत ठरेल : प्रा. रमेश आढाव

टीम : धैर्य टाईम्स

तरुणांच्या पुढाकाराने नोंदणीकृत मंडळ स्थापन होणे ही निश्चित समाज परिवर्तनाची दिशा आहे. भीम जयंती मंडळाच्या वतीने प्रत्येक महिन्याला विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून होणारे उपक्रम समाजाला निश्चितच योग्य दिशा देतील - प्रा. रमेश आढाव

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा समाज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणार असावा असाच होता. तोच विचारांचा वारसा समाजातील तरुणांना स्पर्धात्मक युगात बौद्धिक प्रबळ बनवण्यासाठी जयंती मंडळ सुरू करत असलेले विविध सामाजिक उपक्रम व येणारी भीम जयंती डीजे व फटाके मुक्त करणार असल्याने पिंपरद येथील भीम जयंती जिल्ह्यात आदर्शवत ठरेल असा विश्वास फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांनी व्यक्त केला. ते पिंपरद (फलटण ) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती, पिंपरद (फलटण ) या शासकीय नोंदणीकृत संस्थेच्या प्रमाणपत्र वितरण प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यस्तरीय प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष सचिन मोरे होते.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती, पिंपरद (फलटण ) या संस्थेचे जेष्ठ सल्लागार व विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सातारा सर्कलचे अध्यक्ष शरद मोरे, संस्थेचे अध्यक्ष नीरज मोरे, उपाध्यक्ष विकास मोरे, सचिव विक्रांत मोरे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 पुढे बोलताना प्रा. रमेश आढाव म्हणाले की, पिंपरद सारख्या ग्रामीण भागातील भीम जयंती सोहळ्याचे अधिकृत शासकीय नोंदणी असणारे हे एकमेव मंडळ असेल असे सांगताना तरुणांच्या पुढाकाराने असे मंडळ स्थापन होणे ही निश्चित समाज परिवर्तनाची दिशा आहे. भीम जयंती मंडळाच्या वतीने प्रत्येक महिन्याला विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून होणारे उपक्रम समाजाला निश्चितच योग्य दिशा देतील असा आशावाद प्रा. आढाव यांनी व्यक्त केला. तरुणांसाठी वाचनालय, महिलांसाठी विविध बचत गट योजना असे विविध उपक्रम जयंती मंडळाच्या वतीने राबवावेत अशा सूचना यावेळी प्रा. रमेश आढाव यांनी केल्या.

 कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना सचिन मोरे म्हणाले की, शासकीय नोंदणीकृत डॉ. आंबेडकर जयंती मंडळ व त्या माध्यमातून होणारे उपक्रम ही काळाची गरज आहे. या उपक्रमाला समाज सकारात्मक भावनेतून नक्कीच स्वीकारेल. नवीन सकल्पना राबविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो मात्र तरुणांनी आपल्या घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणे हे यशाचे गमक असते. बौद्धिक उंची कमी असणारे सामाजित दुफळी निर्माण करतात त्यांना आपल्या कार्यातून उत्तर द्या असा सल्ला यावेळी सचिन मोरे यांनी दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शरद मोरे यांनी शासकीय अधिकृत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती मंडळची संकल्पना विषद केली. 2023 ला साजरी होणारी भीम जयंती ही शांतता पूर्ण व विविध जातीधर्मांला एकत्रित करत एक अभूतपूर्व सोहळा असेल असे सांगताना मागील काही वर्षात समाजाला दिशादर्शक कार्य करणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान या जयंती सोहळ्यात करणार असल्याचे आवर्जून सांगितले. अतिशय पारदर्शक कारभार हा संस्थेचा पाया असेल असे सांगताना विविध क्षेत्रातील यशस्वी लोकांची व्याख्यानमाला लवकरच पिंपरद येथे सुरु होईल असे यावेळी शरद मोरे यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती मंडळाच्या शासकीय प्रमाणपत्राचे वितरण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार विकास मोरे यांनी मानले. यावेळी विनोद गायकवाड, अमित खुडे, प्रसन मोरे, समीर मोरे, विजय बनसोडे, राहूल मोरे, संतोष मोहिते, हनुमंत मोरे, बापू मोरे, इंद्रजीत मोरे, अभिजीत मोरे, कुमार मोरे, तानाजी जाधव, शिवा पवार, गजानन पवार, श्रीरंग मोरे, गोविंद मोरे, रवींद्र पालखे, संजय बनसोडे, साजन कांबळे, सर्वेद मोरे, राजदीप मोरे, शुभम बनसोडे, ऋषिकेश बनसोडे, सुहान मोरे, आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER