Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी

शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा

टीम : धैर्य टाईम्स

फलटण  प्रतिनिधी - 


फलटण नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सभेत शहर हद्दवाढीचा, स्टेडियम उभारणीचा अश्या एकूण ४६ ठराव मंजूर करण्यात आले. सभेतील सर्वात चर्चेचा विषय म्हणजे नगरपरिषद इमारती व सभागृहांना महापुरुषांची नावे देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले व मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेस नगरसेवक विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीलाच नगरसेवक विकास काकडे यांनी नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना शासन निर्णयांची माहिती देण्यात यावी, अशी मागणी केली. यावर मुख्याधिकारी यांनी सर्व विषयांची नोंद मिनिट्स बुकमध्ये होत असल्याचे स्पष्ट केले, तर नगराध्यक्षांनी प्रत्येक विषयाची नोंद व्यवस्थित घेतली जाईल, असे सांगितले.


सभेत एकूण ४६ विषयांवर चर्चा झाली. पहिल्या विषयात सन २०२६-२७ साठी विविध विभागांच्या वार्षिक निविदा मागविण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतील कामांवर चर्चा करताना विकास काकडे यांनी त्यांच्या प्रभागात कमी कामे झाल्याची तक्रार मांडली. त्यावर नगराध्यक्षांनी मागणी न केल्यामुळे प्रभाग मागे राहिल्याचे स्पष्ट केले. उपसूचना मतदानात नाकारण्यात आली.


महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतील कामांवर चर्चा झाली. काही नगरसेवकांनी नगराध्यक्षांनी थेट उत्तर द्यावे, अशी मागणी केली. “नमो उद्यान” उभारणीच्या विषयावर चर्चा करताना सौ. स्मिता शहा यांनी वन विभागाच्या जागेचा विचार करावा, अशी सूचना केली. नगराध्यक्षांनी त्या प्रक्रियेस वेळ लागेल, असे सांगितले.


पेठ मंगळवार येथील बुद्ध विहार दुरुस्तीचा विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आला. शहर विकास आराखड्याच्या विषयावर पंकज पवार यांनी झोपडपट्टी भागालाही निधी द्यावा, अशी सूचना केली. पप्पू शेख यांनी विरोधी सदस्यांचे मत ऐकले जात नसल्याची नाराजी व्यक्त केली. यावर नगराध्यक्षांनी सर्व रस्ते सहा महिन्यांत सुधारण्याचे आश्वासन दिले.


नगरपरिषदेच्या विविध कामांना मुदतवाढ देताना निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यास नगराध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.


सभेतील सर्वात चर्चेचा विषय म्हणजे नगरपरिषद इमारती व सभागृहांना महापुरुषांची नावे देण्याचा प्रस्ताव ठरला. या विषयावर सत्ताधारी व विरोधी गटात तीव्र चर्चा झाली. विरोधी सदस्यांनी पूर्वीची नावे बदलू नयेत, अशी भूमिका घेतली. तर सत्ताधारी सदस्यांनी महापुरुषांच्या नावांचा सन्मान करण्याची भूमिका मांडली. नगराध्यक्षांनी हा विषय सर्वसामान्यांच्या भावनांशी निगडित असल्याचे सांगत महापुरुषांचे योगदान अधोरेखित केले. अखेर हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.


नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांसाठी नवीन वाहन खरेदीच्या प्रस्तावावरही चर्चा झाली. काही सदस्यांनी केवळ नगराध्यक्षांसाठी वाहन घ्यावे, अशी सूचना केली. मतदानानंतर हा विषय मंजूर झाला.


शहर हद्दवाढीच्या प्रस्तावावर जाधववाडी परिसर प्राधान्याने समाविष्ट करावा, अशी मागणी करण्यात आली. फरांदवाडी येथील जागेवर स्टेडियम उभारणीचा विषयही चर्चिला गेला. विविध विकास कामांसाठी जमीन खरेदी, मनुष्यबळ उपलब्धता, कार्यालयीन सुधारणा, दिव्यांगांसाठी निधी वितरण अशा विषयांवरही चर्चा झाली.


वीज विभागासोबत कराराचा विषय स्थगित ठेवण्यात आला. नवीन विद्युत पोल उभारणी, दुहेरी लेखा पद्धतीचा अवलंब, अण्णाभाऊ साठे योजनेतील नवीन कामे, मालमत्ता करावरील अभय योजना यासंदर्भात निर्णय घेण्यात आले.


कु. सिद्धाली शहा यांच्या तक्रारीवरून पाणीपुरवठा कामातील त्रुटींवर चर्चा झाली. यासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश नगराध्यक्षांनी दिले.


एनओसी संदर्भातील विषयावर नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी कायदेशीर मुद्दे उपस्थित केले. नगराध्यक्षांनी सभागृहाला माहिती देण्यासाठी हा विषय घेतल्याचे स्पष्ट केले. या विषयावरही सविस्तर चर्चा झाली.


शहरात नवीन शौचालये बांधणे, भुयारी गटार योजनेसाठी जागा खरेदी, विविध योजना राबविणे, एलएएन प्रणाली, सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षा रक्षक नेमणूक, वाहन खरेदी, बाजार व्यवस्थापन, वकील व आर्किटेक्ट नेमणूक, थकीत गाळ्यांचे जप्ती व फेरलिलाव, स्विमिंग पूल भाडेतत्त्वावर देणे अशा अनेक विषयांवर निर्णय घेण्यात आले.


सभेच्या शेवटी पप्पू शेख यांनी ध्वनीप्रणालीबाबत तक्रार केली. त्यावर पुढील बैठकीत सुधारणा करण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले.


एकूणच, या सभेत शहर विकास, प्रशासनिक सुधारणा आणि महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांवर सविस्तर चर्चा होऊन अनेक महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. फलटण शहराच्या विकासाच्या दृष्टीने ही सभा महत्त्वाची ठरली आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER