फलटण प्रतिनिधी –
मधुमेहग्रस्त रुग्णांना आरोग्यदायी जीवनशैलीचा मार्ग दाखविण्यासाठी फलटण येथे “१००% शुगर मुक्त होणार” या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डायबेटीस मुक्त आयुर्वेदिक जीवनशैली अभियानांतर्गत रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन, फलटण व आनंदी कन्सल्टंसी, वडूज यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ६ मार्च रोजी दुपारी ४ वाजता महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे हे शिबिर होणार आहे.
या शिबिरामध्ये मधुमेह रुग्णांची रक्ताची मोफत तपासणी करण्यात येणार असून आरोग्यदायी जीवनशैली कशी अंगीकारावी याबाबत तज्ञांकडून मोलाचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. मधुमेहावर नियंत्रण मिळवून १०० टक्के शुगर मुक्त होण्याचा फॉर्म्युला यावेळी सांगण्यात येणार असून, यापूर्वी शुगरमुक्त झालेल्या व्यक्ती आपले अनुभवही उपस्थितांसमोर मांडणार आहेत.
सध्या अनेक नागरिक मधुमेहामुळे त्रस्त असल्याने त्यांच्यासाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच इतर आजारांबाबतही तज्ञांकडून मोफत सल्ला दिला जाणार आहे. कार्यक्रमात उपस्थितांमधून १० लकी ड्रॉ काढण्यात येणार असून आयोजकांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.











