फलटण प्रतिनिधी :
समाजहितासाठी सतत झटणारे, लोकांच्या अडचणी स्वतःच्या समजणारे, आणि महिला चळवळीचे नेतृत्व म्हणजे सौ. सुपर्णा सनी अहिवळे. फलटण नगर परिषदेच्या प्रभाग 2 मधून त्या भाजपा - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत.
विकासकामांना प्राधान्य देत आपल्या लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे मंगळवार पेठेतील नागरिकांच्यासाठी त्यांचे पती माजी नगरसेवक सनी अहिवळे सातत्याने कार्यरत असतात.
समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, खेळ आणि सांस्कृतिक क्षेत्रात सौ. सुपर्णावहिनी यांचे मोठे योगदान आहे. करोना काळात जेव्हा सर्वत्र भीती आणि अंधार होता, तेव्हा सनी अहिवळे व सौ. सुपर्णावहिनी या आशेचा किरण बनले. करोना काळात एक महिना रोज मंगळवार पेठेमध्ये उत्तम दर्जाचे जेवण लोकांना पुरविले. दोन वेळा किराणा किट वाटप करून अनेक कुटुंबांचे पोट भरले. मोफत कोरोना टेस्ट आणि लसीकरण मोहिमा राबवून आरोग्य जनजागृती केली.
आरोग्य क्षेत्रात त्यांनी मोफत डोळे तपासणी शिबिर, चष्मे वाटप, रक्तदान शिबिरे, तसेच महिलांसाठी आरोग्य शिबिरे व मेळावे आयोजित केले होते. सातत्याने आरोग्य विषयक कार्यक्रमांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला आहे. जनतेचे आरोग्यमान सुधारावे यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात
शिक्षण क्षेत्रातील योगदान
दरवर्षी शालेय विध्यार्थीना वह्या, दप्तर आणि शालेय वस्तूंचे वाटप करण्यात ते आग्रही असतात. आर्थिक दुर्बल विध्यार्थीना शालेय साहित्य मिळावे तथा त्यांना शालेय जीवनामध्ये आर्थिक सहकार्य मिळावे यासाठी सौ. सुपर्णावहिनी अहिवळे यांची सातत्याने सहकार्याची भूमिका ठेवतात.
10 वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करुन त्यांना भविष्यात प्रेरणा मिळावी यासाठी सनीदादा यांच्या खांद्याला खांदा देऊन स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करुन त्यांना शाबासकीची थाप देतात.
सौ. सुपर्णावहिनी या विद्यार्थ्यांकरिता चित्रकला, निबंध स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देतात.
मंगळवार पेठेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी स्वच्छता, समाजविकास आणि विविध सुविधा देण्यात सुपर्णावहिनींचे खास असे योगदान राहिलेआहे. स्वच्छता अभियान, डस्टबिन वाटप असे सामाजिभमुख कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले जातात.
रस्ते, विज, गटार अशा कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे प्रकल्प सुपर्णावहिनींचे पती माजी नगरसेवक सनी अहिवळे यांनी मंगळवार पेठे मध्ये प्रामुख्याने राबविले आहेत. व्यायामशाळा, वाचनालय, समाजमंदिर, शौचालय आणि प्राथमिक शाळा बांधणी यांमुळे मंगळवार पेठ आज एक आदर्श विभाग म्हणून ओळखला जातो याचे श्रेय सनी अहिवळे आणि सौ. सुपर्णावहिनी यांना जाते.
दुर्बल घटकांना आधार देण्याचे कार्य सुपर्णावहिनी यांच्या कडून केले जाते. अनाथाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, वृद्धाश्रमात साडी, शाल व फळांचे वाटप, गरजूंना आर्थिक मदत करण्यातही सुपर्णावहिनी नेहमीच अग्रेसर असतात. महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या काळात सांगलीमध्ये पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात त्यांचे पती सनीदादांचा मोठा वाटा राहिला आहे. प्रतीवर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याला अन्नदान ही त्यांची खरी ओळख आहे.
महिलांसाठी प्रेरणादायी कार्य
दरवर्षी ८ मार्च महिला दिनानिमित्त "आदर्श महिला पुरस्कार" देऊन त्यांनी अनेक महिलांना सामाजिक सहभागासाठी प्रेरित केले आहे.


















