Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

पुणे मुंबई स्थित कॉर्पोरेट हॉस्पिटल सारखी दर्जेदार सेवा जोशी हॉस्पिटल येथे हे अभिमानास्पदच : डॉ. जी. एस. कुलकर्णी

टीम : धैर्य टाईम्स

फलटण दि. १७ : पुणे मुंबई अशा महानगरातील कार्पोरेट हॉस्पिटल पेक्षा उत्तम, अत्याधुनिक वैद्यकीय साधने सुविधा आणि तज्ञ डॉक्टर्स सह सुसज्ज असलेल्या जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण येथे पुणे मुंबईत होत असलेले वैद्यकिय उपचार आणि शस्त्रक्रिया येथे तालुका स्तरावर होतात ही आनंदाची आणि अभिमानास्पद बाब असल्याचे निष्णात अस्थिरोग तज्ञ डॉ. जी. एस. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

         जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटणच्या विस्तारित इमारत व अस्थिरोग उपचार क्षेत्रातील अत्याधुनिक साधने सुविधांनी सुसज्ज रुग्णालयाचे उद्घाटन डॉ. जी. एस. कुलकर्णी, मिरज यांच्या हस्ते समारंभपूर्वक संपन्न झाले. यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो - खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, सातारा जिल्हा परिषद माजी सदस्य प्रल्हादराव साळुंखे पाटील व प्रा. बंडा गोडसे, जिल्हा परिषद महिला बाल कल्याण समितीच्या माजी अध्यक्षा व जय भवानी एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी श्रीमती शारदादेवी कदम, श्रीमती जयश्री जोशी, सद्गुरु व महाराजा संस्था समुहाचे संस्थापक दिलीपसिंह भोसले, स्वयंसिद्धा महिला संस्था समुहाच्या प्रमुख ॲड. सौ. मधुबाला भोसले, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, प्रा. रमेश आढाव, अरविंद मेहता विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

      तालुका स्तरावर जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण हे स्वच्छ, सुसज्ज आणि नावीन्यपूर्ण हॉस्पिटल आपण प्रथम पहात असल्याचे सांगत सर्वसामान्य मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या खिशाला परवडेल अशा अल्प मोबदल्यात दर्जेदार वैद्यकिय उपचार करणारे जोशी हॉस्पिटल आणि डॉ. जोशी दाम्पत्य म्हणजे फलटण करांना परमेश्वराने दिलेली अनमोल देणगी असल्याचे नमूद करीत डॉ. जी. एस. कुलकर्णी यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.

      तालुकास्तरावरील या हॉस्पिटल मध्ये ३५०० सांधे रोपण आणि २० हजारावर हाडांच्या अन्य शस्त्रक्रिया हे खूप काम झाले आणि ते एकट्याने करताना डॉ. प्रसाद जोशी यांना अभ्यास, वाचन यासाठी पुरेसा वेळ मिळणे कठीण होत असल्याने नवीन संशोधन किंवा या क्षेत्रातील अभ्यास यासाठी या हॉस्पिटल मध्ये मदतीला आणखी काही तज्ञ डॉक्टर मंडळी बरोबर घेऊन जबाबदारी विभागण्याची आवश्यकता डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट पणे नमूद केली. 

       उपचार सुरु असताना एकादा रुग्ण दगावतो त्यामध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा दोष नसला तरी त्यांच्यावर आरोप करुन हॉस्पिटलची मोडतोड, डॉक्टरांवर हल्ले होतात, हे गैरसमजातून घडते अलीकडे असे प्रकार वारंवार होत असल्याने आज कोणीही डॉक्टर किंवा हॉस्पिटल अत्यवस्थ रुग्ण दाखल करुन घेण्यास तयार होत नाहीत त्यातून समाजाचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून देत असे प्रकार थांबले पाहिजेत अशी अपेक्षा डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

        डॉ. कुलकर्णी यांनी सशक्त, सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी उत्तम मार्गदर्शन करताना आहार, विहार, व्यायाम याविषयी काही सूचना करताना तळलेले व गोड पदार्थ वर्ज्य करा, फळे, भाज्या विशेषत: कच्च्या भाज्या, काकडी, कोशिंबीर आहारात अधिक असावी, व्यायाम, प्राणायाम, सूर्य नमस्कार याला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला, चालणे अधिक असावे असे आवर्जून सांगितले.

        जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटणच्या नुतनीकरण उद्घाटन प्रसंगी सर्व राजकीय पक्षांचे, विविध क्षेत्रातील विविध विचार धारेची मंडळी एकत्र आहेत यावरुन फलटण करामध्ये डॉ. जोशी यांच्या विषयी असलेली आपुलकी, प्रेम स्पष्ट होत असल्याचे नमूद करीत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी डॉ. प्रसाद जोशी यांच्या कौशल्य पूर्ण दर्जेदार वैद्यकिय सेवेचे कौतुक केले.

          मेट्रो सिटी प्रमाणे अत्याधुनिक साधने सुविधांनी सुसज्ज दर्जेदार हॉस्पिटल तालुका स्तरावर उभे करुन ते सलग २०/२२ वर्षे रुग्णांना समाधान कारक सेवा, सुविधा देवून चालविणे कठीण आहे, परंतू डॉ. प्रसाद जोशी यांनी हे शिवधनुष्य लीलया पेलले असल्याचे नमूद करीत समाजातील रंजल्या गांजल्या, गरिबांना अशाच प्रकारे सेवा सुविधा देत रहा अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यासाठी डॉ. जोशी यांना उदंड आयुष्य, सुख समाधान मिळावे अशी प्रार्थना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी परमेश्र्वराकडे केली.

      प्रारंभी डॉ. प्रसाद जोशी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व प्रमुख पाहुण्यांचे सत्कार केल्यानंतर प्रास्ताविकात हॉस्पिटलच्या विस्तार वाढ व नवनवीन साधने सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल विषयी विवेचन केले.

     दर्जेदार सुश्रुषा आपल्या आरोग्य दायी जीवनाची दिशा हे सूत्र स्वीकारुन गेली २२ वर्षे जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण मध्ये उपचार करताना निष्णात डॉक्टर्स, प्रशिक्षित कर्मचारी, अत्याधुनिक मशिनरी, साधने, सुविधा आणि स्वच्छता ही जबाबदारी स्वीकारुनच कार्यरत राहिलो यापुढेही त्यामध्ये खंड पडणार नसल्याची ग्वाही डॉ. प्रसाद जोशी यांनी दिली. 

     ४० बेडचे अत्याधुनिक आर्थोपेडीक स्पेशालिटी हॉस्पिटल तालुकास्तरावर चालविताना अनंत अडचणी आल्या तरी कोठेही तडजोड न करता सतत दर्जेदार सेवा सुविधा देत राहिल्याने २ राष्ट्रीय व २ राज्य स्तरीय पुरस्काराने या सेवेचा गौरव झाल्याचे निदर्शनास आणून देत आतापर्यंत आणि यापुढेही सतत समाजातील सर्व घटकांना शारिरीक, मानसिक, सामाजिक, अध्यात्मिक आरोग्य उत्तम प्रकारे लाभेल यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याची ग्वाही डॉ. प्रसाद जोशी यांनी दिली.

    प्रा. बंडा गोडसे, रणजित निंबाळकर यांनी हॉस्पिटल सेवेतील अनुभव सांगताना अत्यंत विनम्र व दर्जेदार वैद्यकिय सेवा लाभल्याचे नमूद करीत डॉ. जोशी यांना धन्यवाद दिले. चैतन्य रुद्र्भटे यांनी उत्तम चित्र फिती द्वारे डॉ. जोशी व त्यांच्या कुटुंबाचा आणि जोशी हॉस्पिटलचा परिचय अत्यंत उत्तम प्रकारे करुन दिला.

     प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उप विभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, नगर परिषद मुख्याधिकारी संजय गायकवाड, परिविक्षाधीन प्रांताधिकारी दादासाहेब दराडे यांच्या सह शहर व तालुक्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शहर वासीयानी डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले.

    नवनाथ कोलवडकर यांनी सूत्र संचालन, डॉ. प्राची जोशी यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER