राज्यस्तरीय प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी धैर्य टाइम्सचे संपादक, व धैर्य टाईम्स फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन संपतराव मोरे यांची नुकतीच निवड झाली. या पार्श्वभूमीवर त्यांच्या गावी पिंपरद ता. फलटण येथे विविध संघटनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

हा सत्कार सोहळा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त महोत्सव जयंती समिती पिंपरद, श्रीमती उल्हासबाई मोहन मोरे प्रतिष्ठान पिंपरद, बुद्धांकूर तरुण मंडळ पिंपरद, उमाजी नाईक तरुण मंडळ पिंपरद, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ पिंपरद, जय हनुमान तरुण मंडळ पिंपरद यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार घेण्यात आला.
सचिन संपतराव मोरे यांचा सत्कार उमाजी नाईक तरुण मंडळाचे अध्यक्ष लखन आडके, विद्युत तांत्रिक क्षेत्र युनियनचे अध्यक्ष तसेच श्रीमती उल्हासबाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद मोरे ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त महोत्सव जयंती समितीचे अध्यक्ष निरज मोरे, उपाध्यक्ष विकास मोरे, सचिव विक्रांत मोरे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाचे अध्यक्ष अमित खुडे, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे विभागीय पदाधिकारी राजेश भालेराव तसेच पिंपरद गावचे प्रतिष्ठित व्यक्ती श्रीरंग मोरे, कुमार मोरे, अजित मोरे, समीर मोरे ,नरेंद्र मोरे, उमेश मोरे, अभिजीत मोरे, हरिभाऊ मोरे,आशुतोष मोरे,संजय बनसोडे, महेश गायकवाड, तानाजी जाधव, बापूराव चव्हाण, सागर पवार, शिवाजी पवार, करण पवार तसेच पिंपरद गावचे ग्रामस्थ यांनी पत्रकार सचिन संपतराव मोरे यांचा जाहीर सत्कार केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.