Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

महापुरुषांना जातीय बंधनात अडकवू नका : सुभाषराव शिंदे

शिंदेवाडी गावाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी : शिंदेवाडी पॅटर्न तालुक्यातील परिवर्तन व प्रबोधनाची दिशा ठरेल : रविंद्र बेडकिहाळ
टीम : धैर्य टाईम्स
फलटण प्रतिनिधी : महाराष्ट्र हि साधू, संत, महात्मे, व महापुरुषांची भूमी असून या भूमीतील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी काम केले. तरीही आपण या महापुरुषांना जाती धर्माच्या चौकटीत अडकवीत असल्याची खंत व्यक्त करीत यापुढे महापुरुषांचे जयंती महोत्सव सर्व जातीधर्माच्या लोकांनी एकत्र येवुन गाव व शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साजरे करण्यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील राहणार असल्याचे मत ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी व्यक्त केले.

शिंदेवाडी ता.फलटण येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शरद प्रतिभा शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.प्रतिभाताई शिंदे, सरपंच सौ.निर्मला शिंदे, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, प्रा.रमेश आढाव, माजी प्राचार्य रविंद्र येवले, साहित्यिक तानाजी जगताप, संजय अहिवळे, उपसरपंच अनिल शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात लाखो भाविक एकत्र येतात त्यावेळी कुणीही जात धर्म विचारत नाहीत मात्र अलीकडे महापुरुषांचे जयंती उत्सव जाती निहाय साजरे होताना दिसत असून हे चित्र सामाजिक दृष्ट्या धक्कादायक आहे. सामाजिक समता निर्माण होण्यासाठी या महापुरुषांचे जयंती उत्सव समाजातील सर्व घटकांनी एकत्र येवुन साजरे केले पाहिजेत अशी अपेक्षा सुभाषराव शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील प्रत्येक समाज घटकासाठी काम केले. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवुन आपण समाजव्यवस्थेत काम करीत असून डॉ.आंबेडकर यांची जयंती गावाच्यावतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला. देशातील प्रत्येक समाजघटकांसाठी काम करणाऱ्या महापुरूषांच्या प्रती आपल्या भावना भारतीयत्वाचा असल्या पाहिजेत असे सुभाषराव शिंदे यांनी यावेळी सांगितले.

शिंदेवाडी पॅटर्न तालुक्यातील परिवर्तन व प्रबोधनाची दिशा ठरेल : रविंद्र बेडकिहाळ 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्व समाजाचे नेते होते. त्यांनी भारताला संविधान देवून प्रगतीची नवी दिशा दिली. त्यामुळे अशा आदर्श व्यक्तिमत्वाची जयंती सर्व समाजानेच साजरी केली पाहिजे. ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी शिंदेवाडी येथे सर्व ग्रामस्थांना एकत्र करून डॉ.आंबेडकर यांची जयंती साजरी केली, हा शिंदेवाडी पॅटर्न तालुक्यातील परिवर्तन व प्रबोधनाची दिशा ठरेल अशी अपेक्षा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी यावेळी व्यक्त केली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त देशाला राज्यघटनाच दिली असे नव्हे तर सामान्य वंचित घटकांना न्याय व स्वाभिमानाने जगण्याचा आत्मविश्वास व अन्याय विरुद्ध लढण्याचे बळ दिले. शालेय विद्यार्थी व तरुण पिढीसमोर पुन्हा नव्याने डॉ.बाबासाहेबांचे विचार देण्याची आवश्यकता असल्याचे माजी प्राचार्य रविंद्र येवले यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक तानाजी जगताप, प्रा.रमेश आढाव आदींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटातील विविध पैलूंवर विचार व्यक्त केले.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 शरद प्रतिभा शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. युवा उद्योजक महेश शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध संस्थाचे पदाधिकारी, ग्रामसेवक, शिंदेवाडी, खुंटे, कांबळेश्वर, पाटणेवाडी, वडजल या गावातील ग्रामस्थ, शरद प्रतिभा हायस्कूलचे शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER