फलटण प्रतिनिधी :- मौजे दुधेबावी येथे बोअरवेल ट्रकने दुचाकीस मागून धडक देऊन दुचाकी वरील चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३ रोजी दुपारी ३:४५ वाजण्याच्या सुमारास मौजे दुधेबावी ता. फलटण गावचे हद्दीत एस.टी. स्टॅण्ड समोरील स्पिड ब्रेकर येथे फिर्यादी गिरीश पोपटराव तांबे (रा. शारदा नगर बारामती ता. बारामती जि. पुणे) यांचा भाऊ सोमा (सोमनाथ) रामचंद्र तांबे (वय 52 वर्षे रा. मुर्टी ता. बारामती जि. पुणे) हा त्याची युनिकॉर्न मोटरसायकल क्र. MH 42 AZ 1551 वरून फलटण च्या दिशेने निघाला होता. त्याचे मागुन आलेल्या बोअरवेल ट्रक (अशोक लेलंड कंपनीचा दहा टायर ट्रक) क्रमांक MH 10 DQ 3509 वरील चालक बापुराव महापुरे (रा. घानवड ता. खानापुर जि. सांगली) याने त्याच्याकडील ट्रक हयगयीने भरधाव वेगात रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवुन जोरात धडक मारून फिर्यादी यांच्या भावाचे गंभीर दुखापतीस व मृत्यूस व गाडीचे नुकसानीस कारणीभुत झाला आहे अशी ट्रक चालका विरूध्द तक्रार ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास पोउनि आरगडे करत आहेत.


















