Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण न्यायालय परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; ४ हजारांची लाच घेताना खासगी वकील रंगेहात जेरबंद दुधेबावी फेस्टिव्हलचे सलग २६ व्या वर्षी आयोजन; ६ नोव्हेंबरपासून रंगणार संत गाडगेबाबा व्याख्यानमाला युवा उद्योजक, यशस्वी बिल्डर आणि धाडसी राजकीय व्यक्तिमत्त्व सागर शहा सौ. प्रिया अमोल नाळे-बोराटे यांची राज्य स्तरावर आयडॉल शिक्षक म्हणून निवड फलटण तालुक्यासाठी धोम-बलकवडीचे आवर्तन किमान ४५ दिवस सोडावे; पाणीपट्टी माफ करण्याची आमदार सचिन पाटील यांची मागणी दादांना मानलं पाहिजे! विरोधकांकडूनही रणजितदादांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचे कौतुक; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दाखवली ताकद! सोसायटी मतदारसंघात समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा अवघ्या 11 मतांनी पराभव; विजयापेक्षा संघर्षाचीच तालुक्यात चर्चा प्रत्येकाचे नशीब जॅकी श्रॉफ सारखे नसते एखादाच असतो ज्याला अशी संधी मिळते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी फलटणमध्ये कलम १६३ लागू; मतदान केंद्र परिसरात कडक निर्बंध - कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव श्री दत्त इंडिया साखर कारखान्याकडून सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाच्या बिलापोटी प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे रक्कम वर्ग - मुख्य प्रशासनाधिकारी अजितराव जगताप यांची माहिती ५६ गावांत ३२ विषयांवर प्रवचनांची यशस्वी मालिका; भारतीय बौद्ध महासभा फलटण शाखेचा वर्षावास सांगता समारोह उत्साहात संपन्न आपली फलटण मॅरेथॉनच्या माध्यमातून डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी लोकांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची : रणजितसिंह नाईक निंबाळकर शेतकरी-जनावरांचा पाण्यासाठी टाहो, नेत्यांना पाहिजे घुंगरांचा खणखणाट! शेतकरी पाणी - चाऱ्यासाठी हवालदिल, नेते मात्र लावणीच्या तालावर दंग सांगलीतील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत फलटण वकील संघाची चमकदार कामगिरी; सातारा जिल्हा गुणतालिकेत प्रथम आधी रेट बघा मग खरेदी करा! सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आणि एस.एस. मोबाईलमध्ये दसरा-दिवाळीनिमित्त बंपर ऑफर्सची पर्वणी माळजाई देवीची महाआरती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार - प्रमोद निंबाळकर यांची माहिती भाजपला दिलेला पाठिंबा ॲड. कांचन खरात यांनी घेतला मागे; स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवणार संविधान व घटनात्मक संस्थांच्या संरक्षणासाठी ॲड. कांचन खरात यांचे निवेदन; निष्पक्ष चौकशीची मागणी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू ते दमदार पत्रकार - शक्ती भोसले विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त भव्य दांडिया स्पर्धा; लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांच्या देवीच्या गोंधळाचे आकर्षण कै. श्रीराज दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिर परिसरात वॉटर कुलर भेट सिद्धी अबॅकस अकॅडमीचा राज्यस्तरीय स्पर्धेत डंका ; १२३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी ₹३ हजारांची लाच; मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे मंगळवार ६ ऑक्टोबरला भव्य आयोजन महिला व मुलींना मोठी संधी : मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स उत्तम मानसिक आरोग्य हीच खरी धनसंपदा : डॉ. दीपक राऊत सोनार समाजाचा सर्व शाखीय राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके)

विंचवाच तेलच्या लेखिका सुनीता भोसले यांना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार जाहीर

टीम : धैर्य टाईम्स

सातारा येथील संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री महामाता भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या चोवीसाव्या पुरस्कारासाठी पारधी समाजाच्या आत्मसन्मानाची लढाई लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या,'विंचवाचं तेल' या बहुचर्चित आत्मकथनाच्या लेखिका सुनीता भोसले (आंबळे-शिरुर , पुणे ) यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे व उपाध्यक्ष रमेश इंजे यांनी दिली.

     संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने साहित्य,कला, संस्कृती , महिला विकास व परिवर्तनाची चळवळआदी क्षेत्रात मौलिक योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्याच्या हेतूने १९९८ सालापासून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये, स्मृतीचिन्ह,शाल, गुच्छ असे आहे.

      यावर्षीचा २४ वा मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार सुनीताताई भोसले यांना ज्येष्ठ विचारवंत,लेखक, शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी नगर वाचनालयाच्या पाठक हाॅलमध्ये होणा-या सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.

    पुरस्काराच्या मानकरी सुनीताताई भोसले मानवी हक्क अभियानाचे संस्थापक स्मृतीशेष ॲड. एकनाथ आवाड उर्फ जिजा यांच्या प्रेरणेने फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा आदिवासी भटक्या समाजात रुजवण्याचे काम गेले वीस वर्षा पासून करीत आहेत. त्यांनी क्रांती संस्था व आदिवासी फासेपारधी समाज संघटना, महाराष्ट्र च्या माध्यमातून शैक्षणिक विकासाचे रचनात्मक काम हाती घेतले आहे. त्यांनी भटक्या समाजातील अनिष्ट चालीरीती,प्रथा मोडीत काढण्यासाठी प्रबोधन तसेच अन्याय अत्याचार विरोधात संघर्ष करीत न्याय व हक्क मिळवण्यासाठी लढाई चालवली आहे.त्यांनी पुणे जिल्ह्यातील जातपंचायत थांबवण्यात पुढाकार घेऊन मोठे योगदान दिले आहे. 

 महाराष्ट्र फौंडेशनच्या वतीने कार्यकर्ता पुरस्कार देऊन त्यांना अलिकडेच सन्मानित करण्यात आले आहे.

      भीमाबाई आंबेडकर पुरस्काराने आतापर्यंत डॉ. ज्योती लांजेवार (नागपूर),प्रा.पुष्पा भावे (मुंबई), रझिया पटेल (पुणे), बेबीताई कांबळे (फलटण), यमुनाबाई वाईकर (वाई),प्रा.डाॅ.प्रज्ञा दया पवार(मुंबई), उर्मिला पवार (मुंबई), डॉ.सिसिलिया कार्व्हालो (वसई),प्रा.इंदिरा आठवले (नाशिक), पद्मश्री तिस्ता सेटलवाड (मुंबई),हिरा बनसोडे (मुंबई), प्रतिमा जोशी (मुंबई), उल्का महाजन (पनवेल),प्रा. सुशीला मूल-जाधव (औरंगाबाद), डॉ.गेल ऑम्वेट (कासेगाव), मेधाताई पाटकर (मुंबई),संध्या नरे-पवार (मुंबई),मुक्ता दाभोलकर (दापोली), मुक्ता मनोहर (पुणे),प्रा.आशालता कांबळे (डोंबिवली),निशा शिवूरकर (संगमनेर) व शिल्पा कांबळे (मुंबई),चेतना सिन्हा (म्हसवड-माण)आदी मान्यवर महिलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER