फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक किशोर घोलप व सौ. शशिकला घोलप यांनी राजे गटाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी किशोर घोलप यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत केले. घोलप यांच्या अनुभवाचा आणि जनसंपर्काचा फायदा आगामी निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
किशोर घोलप व शशिकला घोलप हे फलटण शहरातील एक सक्रिय माजी नगरसेवक म्हणून ओळखले जातात. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्षांतर केल्याने राजे गटासाठी प्रभाग क्रमांक ३ व ४ साठी हा चिंतेचा विषय ठरला आहे. दुसरीकडे, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील महायुतीमध्ये (भाजप-राष्ट्रवादी) एकामागोमाग एक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी प्रवेश करत असल्याने त्यांची बाजू भक्कम होत आहे.


















