फलटण प्रतिनिधी -
सिद्धेश्वर हायस्कूल पिंपरद मधील विद्यार्थी चि. प्रणव दयानंद मोरे याने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी घेण्यात येणारी NMMS (National Means-cum-Merit Scholarship) शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
त्याच्या या यशाबद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती पिंपरद यांच्या वतीने त्याचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रणवच्या यशाचे कौतुक करत त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याच्या मेहनत, चिकाटी व जिद्दीमुळे हे यश शक्य झाले असून इतर विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणादायी ठरला आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन केले.










