Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

खंडाळा कारखाना पंधरा दिवसात सुरू करून दाखवावा

माजी आमदार मदन भोसले यांचे आमदार मकरंद आबांना आव्हान
टीम : धैर्य टाईम्स
Khandala factory should be started in fortnight
खंडाळा शेतकरी सहकारी साखर कारखाना गाळप हंगाम सुरु करायला वर्षाचा कालावधी का घालवता? किसनवीर बरोबर असलेला भागिदारी करार आठ दिवसात दुरुस्त करुन देण्यात तयार आहोत. हा कारखाना येणाऱ्या पंधरा दिवसात सुरु करावा, असे आव्हान आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील निवडुन आलेल्या सत्ताधाऱ्यांना किसनवीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी पञकार परिषेदत केले.

खंडाळा : खंडाळा शेतकरी सहकारी साखर कारखाना गाळप हंगाम सुरु करायला वर्षाचा कालावधी का घालवता? किसनवीर बरोबर असलेला भागिदारी करार आठ दिवसात दुरुस्त करुन देण्यात तयार आहोत. हा कारखाना येणाऱ्या पंधरा दिवसात सुरु करावा, असे आव्हान आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील निवडुन आलेल्या सत्ताधाऱ्यांना किसनवीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी पञकार परिषेदत केले.
यावेळी ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे, किसनवीर कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, संचालक सी.व्ही.काळे, राहुल घाडगे, चंद्रकांत इंगवले, रतनसिंह शिंदे, सचिन सांळुखे, प्रविण जगताप, प्रताप यादव व किसनवीर कारखान्याचे संचालक चंद्रकांत यादव व कार्यकर्ते उपस्थित होते.
मदन भोसले पुढे म्हणाले, नवनिर्वाचित सत्ताधारी यांना हवी ती मदत करायला तयार आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी हा कारखाना जिवाचे रान करुन उभा केला आहे. म्हणून कोणालाही याचे आॕडीट करायचा अधिकार नाही. हिशोब मागता काय, कारखाना उभारणीस का धावुन आला नाही? असे प्रश्न विचारण्यापेक्षा उभा केलेला कारखाना 15 दिवसात सुरु करा. यासाठी भागिदारीचा 18 वर्षाचा करार आठ दिवसात तडजोड करायला तयार आहे.
आपणास उपमुख्यमंञी अजित पवार, सहकार मंञी बाळासाहेब पाटील तसेच जिल्हा मध्यवती बँकेची सुध्दा साथ आहे. म्हणून करार मोडायला वर्षभर लागणार नाही, सर्व मदत करायला तयार आहे. माञ स्वतःच्या जमीनी तारण ठेवणार्‍या संचालकांना वार्‍यावर सोडु नका, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
खंडाळा कारखाना निवडणुकीत आलो नाही याबद्दल बोलताना भोसले म्हणाले, खंडाळ्याच्या राजकारणात मी ढवळाढवळ करत नाही. तसेच मला बोलविण्यातही आले नाही. यावर गाढवे सरांना विचारा. याबाबत शंकरराव गाढवे यांनीही दुजोरा दिला.
मोठे जिवाचे रान करुन हा कारखाना उभा केला. यासाठी खुप यातनाही सोसल्या आहेत. म्हणून माझ्या कामाचे आॕडिट करु नका. यावेळी कोणीही ईकडे फिरकले सुध्दा नाही. तरी याविषयावर बोलण्यापेक्षा हा कारखाना त्वरीत सुरु करावा, एवढीच माफक अपेक्षा मदन भोसले यांनी या पञकार परिषदेत व्यक्त केली. तसेच सुरुवातीलाच निवडुन आलेल्या सर्व संचालकांचे त्यांनी अभिनंदनही केले.
या पञकार परिषदेत आभार मानताना शंकरराव गाढवे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी हा कारखाना उभा केला. यासाठी मदनदादाचे सहकार्य मिळाले. सहकारातला हा शेवटचा असणारा कारखाना सहकाराचाच रहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शंकरराव गाढवे यांचा वाढदिवस असताना अपेक्षा व्यक्त केली,कि माझे सर्व स्वप्न पुर्ण झाले आहेत.माञ म्हवशीच्या माळरानावर खंडाळा कारखाना उभा करण्यासाठी किसनवीरने मदत करावी आणि याच अपेक्षापुर्ती साठी किसनवीर ने खंडाळा कारखान्यासाठी मदत केली असल्याची आठवण किसनवीरचे अध्यक्ष मदन भोसले यांनी यावेळी सांगितली. करखाना निवडणुक पराभवानंतर मदनदादा काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. माञ मदन भोसले यांनी कारखाना उभा करण्यासाठी मदत करण्याची भुमिका येथे मांडली.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER