डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त निरगुडी ( फलटण ) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विध्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी व डॉ. आंबेडकर यांचे जीवन अभ्यासता यावे या करीता डॉ. आंबेडकर यांचे जीवन चरित्रांची पुस्तके विध्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे युवा तरुण आणि युवा उद्योजक सहदेव बनसोडे, अजय सोनवणे, दयानंद बनसोडे, मुकेश सोनवणे, यांच्या विशेष सहकार्याने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित पुस्तके व चित्रकलेच्या वह्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचले पाहिजेत तसेच भीम जयंती ही नाचुन नाही तर वाचुन साजरी झाली पाहिजे या उद्देशाने प्रेरित होउन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राचे पुस्तके विध्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आली.
यावेळी सचिन काकडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी मार्गदर्शन केले. महेंद्र गोरे, प्रशांत सोनवणे, धनंजय लकडे यांनीही मनोगते व्यक्त केली.
यावेळी जिल्हा परिषद शाळा निरगुडीच्या मुख्याध्यापिका सौ.उर्मिला वसव मॅडम, श्रीमती. उज्वला भोकरे मॅडम, महेंद्र बर्गे सर, सचिन काकडे सर ,सौ.जयश्री कदम मॅडम, अभिजित रणवरे, सौ. उमा भोसले मॅडम, सर्व शिक्षक तसेच महावीर बनसोडे किशोर सोनवणे, तुकाराम आवटे, जगन्नाथ सोनवणे, तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.



















