कृषी पंपाची वीज तोडणी त्वरित थांबवावी, उसाला एकरकमी एफआरपी मिळावी तसेच सदोष कृषी पंपाची वीज बील दुरूस्त करून मिळावे, वीज दर नियामक आयोगात सुचवलेली ३७ टक्के दरवाढ रद्द करावी, शेतीचा दिवसा १२ तास लाईट मिळावी अशा व विविध मागण्यांसाठी फलटण येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला प्रतिसाद देत सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर व फलटण तालुका अध्यक्ष नितीन यादव यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने फलटण - सातारा रोडवर वाठार - निंबाळकर (चिंचपाटी) येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
कृषी पंपाची वीज तोडणी त्वरित थांबवावी, उसाला एकरकमी एफआरपी निकाली, सदोष कृषी पंपाची वीज बील दुरूस्त करून मिळावे, वीज दर नियामक आयोगात सुचवलेली ३७ टक्के दरवाढ रद्द करावी, शेतीचा दिवसा १२ तास लाईट मिळावी, ऊस तोडणी साठी ५ ते १० हजार मागणी करणारया मुकादमावर खंडणीचे गुन्हे दाखल करावे, नियमीत कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान त्वरीत शेतकऱ्यांचा खात्यावर जमा करावेत या प्रमुख मागणीसाठी चक्काजाम आंदोलन फलटण तालुक्याच्या वतीने करण्यात आले.
या वेळी आंदोलकांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन नंतर मुक्त करण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, जिल्हा सरचिटणीस डाॅ रविंद्र घाडगे, तालुका अध्यक्ष नितीन यादव, युवा आघाडी राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे,पक्ष तालुका अध्यक्ष दादा जाधव, फलटण शहराध्यक्ष सचिन खानविलकर,पक्ष उपाध्यक्ष शकिल सिकंदर मणेर,बाळासाहेब शिपकुले,प्रल्हाद अहिवळे,शिवाजी सोडमिसे,निखिल नाळे,शशिकांत नाळे,नारायण अभंग,किसन शिंदे,पिंटू भापकर,राहुल कदम उपस्थित होते.



















