फलटण प्रतिनिधी:- मौजे सरडे येथे दोन वेगवेगळया घटनेत घरासमोर लावलेल्या दोन दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ रोजी (नक्की वेळ माहित नाही) मौजे सरडे ता. फलटण येथे फिर्यादी महेंद्र रघुनाथ खरात (रा. सांगवी मायनर ता. फलटण) यांच्या मावशीचे राहते घराचे समोर उभी असलेली होंडा शाईन ड्रम गाडी क्र. MH 11 CX 8326 व रोहित गोरख भोसले (रा. सरडे ता. फलटण) याची त्याचे राहते घरासमोरुन स्प्लेंडर प्लस गाड़ी क्र. MH 11 DG 5841अशा दोन्ही गाड्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने आमचे संमती शिवाय मुद्दाम लबाडीने चोरून नेहल्या आहेत. याप्रकरणी महेंद्र रघुनाथ खरात यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक काशीद करत आहेत.


















