फलटण :
महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा आणि सक्षम फाउंडेशन, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने उत्पादन क्षेत्रातील आस्थापनांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा रोजगार मेळावा मंगळवार, दि. 26 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बी.आर. आंबेडकर आय.आय.टी., ए ब्लॉक, मोनिता गार्डन, लक्ष्मीनगर, ता. फलटण, जि. सातारा येथे होणार आहे.
या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमध्ये आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, बारावी, पदवी तसेच संगणक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कॅमिन्स इंडिया लिमिटेड, रिल्स इंजिटेक, जॉन्सन लिमिटेड, भारत बँक आणि साई सप्लायर्स आदी आस्थापनांमध्ये विविध पदांसाठी एकूण 94 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.
उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांसह व बायोडेटासह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. तसेच प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) अंतर्गतही ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










