Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी

जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील

टीम : धैर्य टाईम्स

पैसा कमावणं सोपं आहे, पण माणसं कमावणं हीच खरी श्रीमंती आहे. अशाच प्रकारे पैशापेक्षा माणसे कमवणारा... एक अवलिया पत्रकार जिद्दी संघर्ष योद्धा यशवंत खलाटे - पाटिल. अतिशय सर्वसामान्य परिस्थितीतून स्वतःच्या जीवनाला आकार देत आज एक स्वतःचे विश्व निर्माण केले आहे. आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने या संघर्ष योद्धाच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्याचा हा अल्पसा प्रयत्न...


खुंटे ता. फलटण येथील एका शेतकरी कुटुंबात यशवंत यांचा जन्म. पारंपरिक शेती करण्यापेक्षा व्यवसाय करुन आयुष्याला वळण देण्यासाठी यशवंत यांनी थेट फलटण गाठले. आणि येथूनच सुरु झाला एका संघर्ष योद्धाचा जीवन प्रवास. 


जन्माने मिळविलेल्या श्रीमंती पेक्षा कर्माने निर्माण केलेली परिस्थिती यावर विश्वास ठेवत यशवंत यांनी अतिशय कमी वयामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. शालेय जीवनामध्ये फारस यश प्राप्त न करू शकलेल्या यशवंत यांनी व्यावसायिक क्षेत्रामध्ये स्वतःला "यशवंत" किर्तीवंत म्हणून सिद्ध केले. विविध व्यवसायाच्या माध्यमातून परिस्थितीशी झुंज देत स्वतःला कायम स्पर्धेत ठेवले. विक्री कौशल्य हे यशवंत याची विशेष बाजू. “कोणताही व्यवसाय छोटा नसतो” या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी प्रसंगी कोणतेही काम कमी लेखले नाही. मेहनत, प्रामाणिकपणा आणि जिद्द यांच्या जोरावर त्यांनी स्वतःचं छोटं पण समृद्ध विश्व उभं केलं.


व्यवसाया बरोबरच वृत्तपत्र क्षेत्रांमध्ये यशवंत याने स्वतःला "पुढारी" सारख्या वृत्तपत्राच्या माध्यमातून उत्कृष्ट पत्रकार म्हणून स्वतःला सिद्ध केले. पत्रकारितेतील विविध कौशल्य प्राप्त करत तालुक्यासह जिल्ह्यामध्ये स्वतःची लेखानाची वेगळी शैली निर्माण केली. दैनिक पुढारी आणि दैनिक पुण्यनगरी अशा मोठ्या वृत्तपत्रांमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. त्यांनी केवळ बातम्या दिल्या नाहीत, तर स्वतःची स्वतंत्र शैली विकसित करतानाच पत्रकारितेत आपली वेगळी छाप उमटवली. त्यांच्या या कामामुळे ग्रामीण असेल किंवा शहरी पत्रकारांना प्रेरणा मिळते. 


सुप्रसिद्ध दैवत्व मावा केक या व्यवसायाचे ते संचालक आहेत. जिभेवर रेंगाळणारी चव असणारा मावा केक अल्पवधितच लोकांच्या घरा - घरात पोहोचला आहे. तर दैवत्व मावा केक च्या शाखा आज विविध जिल्ह्यात सुरु झाल्या आहेत. 


या प्रवासात यशवंत यांच्या सुविद्य पत्नी सौ. भारती यांची मिळालेली साथ व कुटुंबाचं पाठबळ हे त्यांचं मोठं बळ ठरलं. माणसं जोडणं, नाती जपणं आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागणं ही त्यांची खरी संपत्ती आहे.


आज, २१ एप्रिल रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त, या जिद्दी आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्वाला मनःपूर्वक शुभेच्छा! यशवंत खलाटे - पाटिल यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून यश लाभो, हीच शुभेच्छा.


- शुभेच्छुक - 

सचिन संपत मोरे, फलटण.

जिल्हाध्यक्ष तथा राज्य समन्वयक 

प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य 


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER