Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

‘लाँग डीस्टन्स रनिंग’ नंतर

टीम : धैर्य टाईम्स
आजकाल अनेक व्यायामप्रकारांमध्ये धावणे हा व्यायामप्रकार अतिशय लोकप्रिय होऊ लागला असून, यामध्ये लाँग डीस्टन्स रनिंग हा प्रकारही लोकप्रिय होऊ लागला आहे. ’हाफ’ किंवा ’फुल मॅरथॉन’ याच प्रकारामध्ये मोडणारे आहेत.

आजकाल अनेक व्यायामप्रकारांमध्ये धावणे हा व्यायामप्रकार अतिशय लोकप्रिय होऊ लागला असून, यामध्ये लाँग डीस्टन्स रनिंग हा प्रकारही लोकप्रिय होऊ लागला आहे. ’हाफ’ किंवा ’फुल मॅरथॉन’ याच प्रकारामध्ये मोडणारे आहेत. ’हाफ’ मॅरथॉनच्या अंतर्गत धावपटू एकवीस किलोमीटरचे अंतर धावून पार करीत असतो, तर ’फुल’ मॅरथॉनच्या अंतर्गत हेच अंतर बेचाळीस किलोमीटर इतके असते. अशा प्रकारचे लाँग डीस्टन्स रनिंग करण्यासाठी योग्य सराव आणि पोषक आहाराची आवश्यकता असते. त्याचबरोबर जास्त अंतरे धावण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी इतर पूरक व्यायामाची जोड देणेही आवश्यक असते. लाँग डीस्टन्स रनसाठी आवश्यक ती तयारी करणे गरजेचे असतेच पण त्याचबरोबर हे रनिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्या शरीराची काळजी कशा प्रकारे घेतली जावी हे जाणून घेणे ही तितकेच महत्वाचे ठरते. लाँग डीस्टन्स रान पूर्ण झाल्याच्या पाच ते दहा मिनिटांच्या नंतर सतत थोडे थोडे पाणी पीत राहणे आवश्यक आहे. रन पूर्ण झाल्यानतर किमान 250 मिलीलीटर पाणी त्वरित पिणे आवश्यक आहे. त्याच्या जोडीने एखादे एनर्जी ड्रिंकही सेवन केले जावे. त्यानंतर शरीराच्या सर्व स्नायूंना योग्य ताण मिळावा अशा पद्धतीचे ’स्ट्रेचिंग’चे व्यायामप्रकार केले जावेत. कोणत्या ही व्यायामानंतर स्नायूंचे स्ट्रेचिंग होणे अतिशय आवश्यक असते. जास्त अंतर धावल्यानंतर पायांच्या पिंढर्‍या, मांड्या आणि घोट्याच्या स्नायूंचे स्ट्रेचिंग महत्त्वाचे ठरते. यामुळे स्नायूंमध्ये रक्ताभिसरण सुरळीत होते. जर स्नायूंचे स्ट्रेचिंग योग्य प्रकारे केले गेले नाही, तर स्नायूंमध्ये असह्य वेदना उत्पन्न होण्याची शक्यता असते.
रन पूर्ण झाल्यानंतरच्या सुमारे अर्धा तासानंतर कर्बोदके आणि प्रथिने जास्त असलेला हलका आहार घ्यावा. त्यानंतर सुमारे अर्धा तासाच्या अवधीने थंड पाण्याने स्नान करावे. थंड पाण्याने स्नान केल्याने शरीरावर अत्यधिक शारीरिक श्रमांमुळे ( जास्त अंतर धावल्याने) हलकी सूज आली असल्यास ती कमी होण्यास मदत होते. स्नान करून झाल्यानंतर कॉम्प्रेशन सॉक्स घालवेत. या प्रकारच्या पायमोज्यांमुळे स्नायूंची वेदना कमी होयास मदत होते. त्यामुळे काही वेळाकरिता हे पायमोजे घातले जावेत.
स्नान उरकल्यानंतर सुमारे एका तासाने भोजन घ्यावे. भोजनामध्ये कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि एखादा गोड पदार्थ देखील समाविष्ट असावा. भोजनाच्या नंतर काही वेळाने विश्रांती घ्यावी. जास्त अंतर धावल्याने शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते. त्यामुळे शरीराला आवश्यक त्या प्रमाणात झोप मिळणेही ’रिकव्हरी’च्या दृष्टीने महत्वाचे ठरते. संध्याकाळच्या वेळी हलके भोजन केल्यानंतर झोपण्याआधी हलके स्ट्रेचिंगचे व्यायाम पुनश्‍च केले जावेत. त्यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते. रात्रीची झोप किमान आठ तासांची असावी.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER