फलटण प्रतिनीधी -
वाखरी, ता. फलटण येथील अक्षता आबासो ढेकळेला राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 2022-23 चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर केला आहे.
राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासह विविध पुरस्कार दिले जातात. सन 2022-23 या वर्षाच्या पुरस्कार्थींची निवड करण्यासाठी 9 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यस्तर पुरस्कार निवड समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशी विचारात घेऊन सन 2022-23 या वर्षाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यामध्ये फलटण तालुक्यातील हॉकी खेळाडू अक्षता ढेकळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर केला आहे.











