फलटण प्रतिनिधी :
फलटण मुस्लिम बांधवांनी नेहमीच समाजापुढे आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे गत वर्षांप्रमाणे यंदाही येणाऱ्या दि. २९ जून रोजी बकरी ईद यादिवशी आपल्या हिंदू समाजबांधवांचा "आषाढी एकादशी" हा पवित्र सण येत असल्याने त्यादिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
२९ जूनला आषाढी एकादशी आहे. त्याच दिवशी मुस्लिम बांधवांची बकरी ईदसुद्धा साजरी होणार आहे. हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहे. हिंदू मुस्लिम बांधवांतील सामाजिक एकोपा टिकून राहावा, यासाठी फलटण तालुक्यातील व शहरातील मुस्लिम बांधवांनी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुका व शहरात मुस्लिम बांधव कुर्बानी देणार नाही, असे पत्र फलटण शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे. २९ जूनला बकरी ईद ला कुर्बानी न करता शुक्रवार दि.३० जून रोजी कुर्बानी करण्याचा व दि.२९ जून रोजी केवळ ईदची नमाज अदा करण्याचा निर्णय घेत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे पुन्हा एकदा दर्शन दिले आहे.
आषाढी एकादशी अवघ्या काही तासांवर आली आहे. यामुळे प्रत्येकाला विठ्ठलाची आणि आषाढीची आतुरता लागून आहे. हिंदू समाजाचे आराध्य दैवत विठू माऊलीच्या आषाढी एकादशीच्या दिवशी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण आला आहे. हिंदु बांधवांसाठी आषाढी एकादशी हा महत्त्वाचा दिवस असून यासाठी राज्यातून लाखोंच्या संख्येत भाविक हे पंढरपूर येथे मोठ्या भक्तीभावाने सहभागी होतात



















