ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते डॉ. जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे तसेच प्रख्यात पत्रकार प्रसन्न जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे
फलटण प्रतिनिधी -
प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना यंदाचा “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर झाला असून वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची ही दखल मानली जात आहे.फलटण येथील जोशी हॉस्पिटल प्रा. लि. मधून गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णसेवा देत असलेल्या डॉ. जोशी यांनी अस्थिरोग उपचार क्षेत्रात विश्वासार्हता आणि गुणवत्तेची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून हा प्रतिष्ठेचा “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या घोषणेनंतर शहरासह वैद्यकीय, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हा भव्य पुरस्कार सोहळा रविवार, ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ८ वाजता फलटण येथील सजाई गार्डन येथे संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते डॉ. जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे तसेच प्रख्यात पत्रकार प्रसन्न जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
यावेळी अनुबंध कला मंडळाच्या वतीने ‘Magical RD Night’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून संगीतप्रेमींसाठी हा कार्यक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. सुप्रसिद्ध संगीतकार R. D. Burman यांच्या गाजलेल्या गीतांचा सुरेल आविष्कार या कार्यक्रमातून सादर होणार आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने फलटणमध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.










