खासदार रणजितसिंह सेल्फीच्या प्रेमात : क्रांतिसूर्य सेल्फी पॉईंट वर सेल्फी काढत क्रांती सूर्यास अभिवादन
हल्ली सोशियल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या क्लुप्त्या करीत असतात. याकरिता विडिओ, सेल्फी, फोटोशूट करून अनेक जण स्वतःला अपडेट्स केलेचे आपण पाहतो.
असाच काहीसा प्रकार आज फलटण येथे घडला. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने तयारीची पाहणी करताना क्रांतीसूर्य या सेल्फी पॉइंट पहिला. क्रांतिसूर्य या सेल्फी पॉइंटची क्रेज पाहता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी क्षणाचाही विचार न करीता आपल्या मोबाईल मधून सेल्फी घेत क्रांतिसूर्यास अभिवादन केले.



















