Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

फलटण तालुक्यात महसूल विभागातर्फे सेवापंधरवडा साजरा होणार - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी - 


महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार व मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे, मा. मंत्री महोदय (महसूल), महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्र नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म दिन १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या कालावधी दरम्यान संपूर्ण राज्यामध्ये "सेवा पंधरवडा" आयोजित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मा.ना. श्री. सचिन पाटील, आमदार, फलटण (अ.जा.) विधानसभा सदस्य, मा. जिल्हाधिकारी सातारा, मा. उपविभागीय अधिकारी फलटण, उपविभाग फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती एका प्रसिद्ध पत्रकारद्वारे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली.


 या प्रसिद्धी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, प्रथम टप्प्यात शिवरस्ते, पाणंद रस्ते यांचे सीमांकन घेऊन नकाशावर नोंदी करणे तसेच रस्त्यांना क्रमांक देण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात "सर्वांसाठी घरे" योजने अंतर्गत पात्र लाभार्थीना जागांचे पट्टे नियमानुसार वाटप करण्यात येणार आहेत. तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत पुनर्वसन अंतर्गत प्रकल्पग्रस्ताची प्रश्नांची सोडवणूक करणे, तिसऱ्या टप्यात पोटखराब क्षेत्राचे लागवडीलायक क्षेत्रात रुपांतर करणे, एकाच गावत एकाच नावाच्या अधिक व्यक्ती असल्यास नावामध्ये आईचे नाव किंवा टोपणनाव वाढविणे तसेच आपले सरकार केंद्र व स्वस्त धान्य दुकानांचे नागरिकांमार्फत क्यूआर कोड मुल्यांकन करणे असे विविध उपक्रम तालुक्यात राबविण्यात येणार आहेत.


सेवा पंधरवड्याची सुरवात दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी होणार असून त्याची पूर्वतयारी म्हणून दिनांक ०९/०९/२०२५ ते १४/०९/२०२५ सर्व गावांमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, लोकप्रतिनिधी, पोलीसपाटील, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव यांची शिवार फेरी आयोजित करण्यात आली होती. यावेळी गावनकाशातील सर्व रस्ते तसेच गावनकाशात नसलेले परंतु वहिवाटीत असलेले गाडी रस्ते, पायवाटा इत्यादींचे सर्वेक्षण झाले असून दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते दिनांक १९ सप्टेबर २०२५ पर्यंत विशेष ग्रामसभा आयोजीत करुन ग्रामसभेची मान्यता घेतला जाणार आहे. त्यातूनही विवादग्रस्त अथवा अतिक्रमणग्रस्त राहिलेल्या स्त्यांबाबत तहसिलदार यांचे स्तरावर रस्ता अदालत आयोजित करून सामोपचाराने कार्यवाही करण्यात येणार आहे. यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून सदर सर्व रस्त्यांचे सीमांकन करुन सर्व रस्ते नकाशात दर्शवून अभिलेखात त्यांची नोंद घेण्यात येणार आहे. तसेच याबाबत स्थानिक स्तरावर सर्व लोकप्रतिनिधी व शेतकरी यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


तसेच या योजनेच्या दुस-या टप्यात दिनांक २२/०९/२०२५ ते ३०/०९/२०२५ दरम्यान "सर्वांसाठी घरे" योजने अंतर्गत ग्रामविकास विभागाने सर्वेक्षण करुन अंतिम केलेल्या व शासकीय नियमाप्रमाणे पात्र असलेल्या व्यक्तींना शासकीय जागेचे पट्टे दिले जाणार असून पात्र व्यक्तींचे २०० चौ.फु. पर्यंत अतिक्रमण विहित अटीशर्ती मान्य असल्यास नियमानुकूल केले जाणार आहे. याचा लाभ भूमिहीन अथवा बेघर लोकांना होणार आहे. या दोन्ही टप्यांमध्ये ई पिक पाहणी जनजागृती व अॅग्रीस्टॅक नोंदणी देखील केली जाणार आहे. तसेच भटक्या विमुक्त समाजास व कातकरी समाजास विविध शासकीय दाखल्यांचे वाटप करणेत येणार आहे.


तसेच मा. आमदार साहेब यांनी या अभियानामध्ये महसूल विभागाच्या सर्व सेवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश देत अॅग्रीस्टॅक नोंदणी, छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान, वारसनोंदी अद्यावत करणे तसेच जिवंत ७/१२ उपक्रमासाठी एकूमँ, अ.पा.क नोंदी कमी करणे लक्ष्मी मुक्ती योजना राबविण्यासाठी विशेष मोहिम राबवण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत. या अनुषंगाने संपूर्ण तालुक्यात "सेवा पंधरवडा" साजरा केला जाणार असून महसूल विभागा सोबतच, ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग, कृषी विभाग, भूमी अभिलेख विभाग, पोलीस विभाग व इतर शासकीय कार्यालये या सर्वांच्या सहकार्याने सदर मोहिम यशस्वीपणे राबविण्याचे प्रथम प्रयत्न प्रशासनाचे राहणार असल्याचे शेवटी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER