Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात पिंपरद येथे सौ. सुषमा ताई मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांनी घरोघरी जात केला प्रचार अजितदादा यांच्या सारखे कणखर नेतृत्व पुन्हा घडणार नाही,शेतकऱ्याच्या मुलाला विधानसभेत पाठिंबा दिला - आमदार सचिन पाटील अजित दादांच्या अचानक जाण्याने खूप मोठा धक्का,त्यांचे खूप उपकार सातारा जिल्ह्यावर होते - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी वाहिली श्रद्धांजली कोळकी येथील दांपत्य अपघातात ठार कर्तव्य बजावत असताना तरडगावच्या सुपुत्रचा दुर्दैवी मृत्यू अजित पवार हे जनतेचे नेते होते : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वर केली पोस्ट - उद्या अंत्यसंस्कार तरडगाव येथे राजेगटाला रामराम करीत शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल : ॲड. सौ.जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला विकासाचा शब्द जयकुमार या नावाचा संस्कृतमध्ये अर्थ तरुण विजयी किंवा विजयाचा तरुण वडजल करांचा भाजपमध्ये प्रवेश, विष्णुपंत लोखंडे व धनंजय साळुंखे पाटील यांना एकमुखी पाठिंबा देत आम्ही विकास पुरुष पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे केले स्पष्ट विडणी प्रमाणे धुळदेव,पिंपरद,माझेरी गावाचा विकास होईल, - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग कोळकी गावचे उद्योजक तथा माजी ग्रामपंचायत सदस्य उमेशशेठ काशिद यांचा राजेगटाला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश राजेगटाला जबर धक्का, दडस वस्ती कुरवली येथील शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल, जयकुमार शिंदे अन् युवराज सस्ते चेअरमन यांची प्रचारात आघाडी हाकेच्या अंतरावर एमआयडिसी होणार असून रोजगाराचा अन पाण्याचा प्रश्न माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सुटला आहे - आमदार सचिन पाटील विरोधकांना त्यांची जागा दाखवा : आमदार सचिन पाटील : मुंजवडी येथील कोपरा सभा आम्ही शरद पवारांच्या छताडावर बसून रेल्वे नेली अन तुम्ही फक्त त्यांची चाटायचं काम केले - श्रीमंत रामराजेंवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बोचरी टीका स्व. माजी आमदार चिमणराव कदम यांनी बांधलेले उपजिल्हा रुग्णालय सुरु होऊ दिले नाही अन त्यांचा पुत्र त्यांच्या वळचनीला गेलाय - झिरपवाडी येथे आमदार सचिन पाटील यांचे टिकास्त्र विडणी गणात सचिन अभंग अध्यक्ष यांची प्रचारात मोठी आघाडी, धुळदेव मध्ये तरुण वर्गाने केला विजयाचा निश्चय शिंदेमाळ गावानेच केला भाजपात प्रवेश, स्मिता गायकवाड यांचा विजय सोपा राजे गटाला कोळकीत जोरदार धक्का; युवा नेते अनुप गायकवाड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश जयकुमार शिंदे व युवराज सस्ते चेअरमन यांची प्रचारात आघाडी, गावागावातून होत आहे मोठ्या जल्लोषात स्वागत विडणी गणातील भाजप उमेदवार सचिन अभंग प्रचाराचा आज शुभारंभ फलटण हादरले! पहिल्या प्रियकर व नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराचा निर्घृण खून प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड, स्वीकृतपदी सुदाम आप्पा मांढरे, अशोकराव जाधव फलटणच्या उपनगराध्यक्षपदी प्रियदर्शनी रणजीतसिंह भोसले यांची वर्णी लागण्याची चर्चा विष्णू लोखंडे यांनी वाठार निंबाळकर गटातून भरला जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज निष्ठावंत शिवासैनीकांना जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीला उमेदवारीच नाही, शिवसैनिक पालकमंत्री यांची तक्रार ना. एकनाथ शिंदे यांना करणार? मोठ्या गावातील लोकांना उमेदवारी दिली जाते, मग छोट्या छोट्या गावातील लोकांनी काय सतरंज्या उचलायच्या का? वाठार निंबाळकर येथे मंगळवार 20 जानेवारी रोजी धर्मनाथ बिजोत्सव, व पालखी सोहळा पिंपरद उड्डाणपुलाखालचे खड्डे : लोक मेल्यावरच प्रशासन जागं होणार का? सुरवडी गणातून उद्योजक शंभूराज बोबडे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी फलटण तालुका तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन क्षीरसागर यांची निवड विजयी खेचू शकलो नाही, पण खचलोही नाही; पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करणार – प्रसाद पवार - पाटील मागासवर्गीय विशेष कल्याण समिती नेमावी – नगरसेविका सौ. सुपर्णा सनी अहिवळे कष्ट, निर्भीड लेखणी आणि समाजसेवेचा अखंड प्रवास : ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव भांबुरे सांगवी गावात आदर्श काम केल्याने सनी मोरे यांच्या पत्नी सौ.मनिषाताई मोरे यांना विडणी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी - जनतेतून मागणी फलटण नगरपालिकेचे उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावे –श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांची मागणी : जिल्हा परिषद पंचायत समिती करीता पन्नास टक्के जागा मिळाव्यात दि हॉकी सातारा संघटनेच्या कु निकिता वेताळ कु. श्रेया चव्हाण व कु अनुष्का केंजळे या तीन महिला खेळाडूंची महाराष्ट्र हॉकी संघात निवड के. बी. बायो ऑर्गेनिक्सकडून 'मायकोरिस'चे लोकार्पण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त वाचनालयास पोलीस भरती पुस्तकांची भेट पत्रकार दिनानिमित्त दि. ७ व ८ जानेवारी रोजी फलटण शहर व तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण एक दिलाने काम करुया -पालकमंत्री शंभूराज देसाई

टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि. 15- महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीमध्ये विकासामध्ये, उभारणीमध्ये, प्रतिष्ठेमध्ये सातारा जिल्ह्याने आणि सातारा जिल्ह्याने दिलेल्या नेतृत्वाने, वेळोवेळी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी फार महत्वपूर्ण योगदान दिले आहे,   आज सातारा जिल्हा प्रगतीचे नवनवीन टप्पे गाठत राज्यातील मोजक्या जिल्ह्यांमध्ये पुढे आहे.  याचा मला अभिमान आहे. जिल्ह्याला सर्वांगीण विकासामध्ये अग्रभागी ठेवण्यासाठी पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील सर्व सहकारी मंत्री, सर्व खासदार व आमदारांच्या सहकार्याने व प्रशासनातील सहकारी अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करीत आहे, याला सर्वांचे सहकार्य राहो, असे आवाहन राज्याचे पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोण समारंभ संपन्न झाला.  यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा शल्यचिकीत्सक युवराज करपे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, व त्यांचे परिवारजन यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

यावेळी स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा वासियांना शुभेच्छा देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले,  या जिल्ह्याला थोर स्वातंत्रसेनानीची, सैन्यदलातील थोर वीर सुपूत्रांची खूप मोठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्यवीरांनी देश स्वातंत्र्य करण्यासाठी वेळप्रसंगी कारावास भोगून, भूमीगत राहून, प्राणांची आहूती देवून योगदान दिले.  सातारा जिल्ह्याची राजकीय परंपरा सुद्धा खूप मोठी आहे अगदी महाराष्ट्र, गुजरात एकत्र मुंबई राज्य असताना सुद्धा या जिल्ह्याचे सुपुत्र स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राज्याचे नेतृत्व केले. 

 

सातारा जिल्ह्यामध्ये राज्यातले त्या काळातले 2000 मेगावॅट वीज निर्माण करणारे आणि 105 टीएमसी क्षमता असणारे सगळ्यात मोठे धरण आपल्या जिल्ह्यात आहे.  ज्यावेळी पुनर्वसनाचा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू नव्हता त्यावेळी स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या एका शब्दाखातर पाटण जावळी, व महाबळेश्वर या तीन तालुक्यातील 98 गावांचे पुनर्वसन करण्यात आले याचा आवर्जून उल्लेख करताना पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, 2019 पासून धरणग्रस्तांच्या पूनर्वसनाचे प्रश्न सोडविण्याचा सातत्याने आपणही प्रयत्न करीत आहे.

 

जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून विकसित करत असताना करण्यात येत असलेल्या अनेक उपक्रम योजनांचा उल्लेख करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, जागतिक वारसा स्थळांमध्ये ज्या 12 गडकोट किल्यांचा समावेश करण्यास युनेस्कोने मान्यता दिली आहे त्यातील 11 किल्ले आपल्या महाराष्ट्रातले आहेत.  त्यातला प्रतापगड हा आपल्या सातारा जिल्ह्यातला किल्ला आहे.  यूनेस्कोच्या यादीत समाविष्ट होण्यापूर्वी जिल्हा नियोजन समितीमधून प्रतापगडाच्या संवर्धनासाठी 20 कोटी रुपये आपण मंजूर केले होते. पर्यटन विभागाकडून शिवप्रताप दिनाचे महत्त्व असलेल्या व अफजल वध झालेल्या ठिकाणी विव्हींग गॅलरी मंजूर केली आहे.  त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा हा कसा होता व त्याचे महत्व हे चित्ररूपाने समजावे म्हणून पर्यटन विभागामार्फत संपूर्ण इतिहास दाखवण्याचे काम त्या ठिकाणी करणार आहोत.

 

सातारा जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक नकाशावर येण्यासाठी याच वर्षाच्या मे महिन्यामध्ये महापर्यटन महोत्सव महाबळेश्वर येथे आयोजन करुन सातारा जिल्ह्याचे ब्रँडींग करण्याचे काम करण्यात आले.  सातारा जिल्ह्यातील सातारा, जावळी, वाई, महाबळेश्वर, कराड व पाटण तालुक्यामधील डोंगरी भागातील कला, युवक, महिलां  व कलाकारांमधील विविध गुण राज्यस्तरावर पोहोचविण्या साठी यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये राज्यस्तरीय डोंगरी महोत्सवाचे आयोजन पाटण तालुक्यामध्ये करण्यात येणार आहे.  कोयनानगर येथील नेहरु उद्यानाचा जागतिक दर्जाच्या उद्यानाप्रमाणे विकास करण्यासाठी 75 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून याला मंजूरी घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात येणार आहे.  

 

जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी  गेल्या वर्षी वार्षिक नियोजन आराखडा 671 कोटी रुपयांचा होता.   या वर्षी  जिल्ह्याचा वार्षिक नियोजन आराखडा 744 कोटींपर्यत वाढविला आहे असे सांगून जिल्ह्याला आपण जवळपास 100 कोटीरुपयांचा अधिकचा निधी आणू शकलो याबद्दल पालकमंत्री श्री. देसाई यांनी समाधान व्यक्त केले.  

 

स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्य सैनिकांचे परिवार, शहीद जवानांचे परिवार,  सैन्य दलातले निवृत्त अधिकारी,  उपस्थित मान्यवर, अधिकारी व कर्मचारी, नागरिक यांना स्वातंत्र्यदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.

 

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान व विविध पुरस्कारांचे वितरण

        ध्वजारोहण कार्यक्रमानंतर हवलदार अनिल दिनकर कळसे, रेठरे खुर्द ता. कराड यांच्या वीर पत्नी सुनिता दिनकर कळसे यांना, शहीद काँस्टेबल सूर्वे नवनाथ, घरातघर (गांजे) ता. जावळी यांच्या वीरपत्नी श्रीमती शालन नवनाथ सुर्वे, शहीद काँस्टेबल पवार अमर शामराव, बावडा, ता. खंडाळा, यांच्या वीर पत्नी कोमल अमर पवार, वीरमाता श्रीमती सुरेखा शामराव पावर तसेच वीरपिता शामराव महादेव पवार यांना सेवारत शिपाई इंगवले सागर हणमंत, चिंचणेर निंब ता. सातारा यांना दुखापत झाल्यामुळे 90 टक्के अपंगत्व आले त्यांच्या पत्नी श्रीमती निशा इंगवले, सेवारत नायब सुभेदार पिसाळ संतोष तानाजी, फडतरवाडी, ता. सातारा हे कर्तव्य पार पाडत असताना दुखापत झाल्यामुळे 30 टक्के अपंगत्व आले त्यांच्या पत्नी श्रीमती अनिता संतोष पिसाळ यांना पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते ताम्रपट देऊन सन्मानीत करण्यात आले.  तसेच जमीन वाटपाचे दस्तऐवज वाटप करण्यात आले.  सिजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचेकडून वीर नारी शेतकरी उत्पादक कंपनीला जलसंचय आणि बागायती लागवड समर्थनासाठी 11 लाख 95 हजार रुपयांचा धनोदश देऊन सन्मानीत करण्यात आले. बाळासाहेब भालचीम यांना राष्ट्रपती पदक घोषीत झाले त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.  100 दिवस कार्यालयीन सुधारणांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालय, सातारा या कार्यालयांचा पालकमंत्री यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबराबर अवयव दात्यांना प्रमाणपत्र व जिल्हा परिषद शिक्षण विभागातील पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षा, व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा पुरस्काराचे, जिल्हाधिकारी कार्यालयातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कारही पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मुख्याध्यापक अशोक लकडे यांनी केले.

 

तत्पूर्वी पालकमंत्री श्री. देसाई यांनी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  यानंतर शहीद कर्नल संतोष महाडीक स्मृती उद्यान येथे पुष्पचक्र अर्पण केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER