Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे

गॅलेक्सीच्या गरुड भरारी मध्ये सचिन यादव यांचे नियोजन व निर्धार उपयुक्त ठरला : रामभाऊ लेंभे
टीम : धैर्य टाईम्स

फलटण | धैर्य टाईम्स | 

के. बी. उद्योग समूहातील सर्व विभागांप्रमाणे पतसंस्थेतही दूरदर्शीपणे चांगले निर्णय घेतल्याने स्पर्धेच्या युगातही या संस्थेची प्रगती उत्तम असल्याचे सांगताना आज सहकर क्षेत्रात अनेक प्रसंगांना सामोरे जात असताना प्रगती राहु द्या, आहे ही स्थिती टिकविण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते, अशा परिस्थितीत यशाचे एकेक पाऊल निर्धाराने पुढे टाकत सचिन यादव यशस्वी होत आहेत, हे कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक व छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी केले आहे.

 गॅलेक्सी को - ऑप. क्रेडिट सोसायटी लि., फलटणच्या फलटण येथील ४ थ्या शाखेचा कामकाज शुभारंभ रामभाऊ लेंभे यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आला, अध्यक्षस्थानी के. बी. उद्योग समूहाचे संचालक व गॅलेक्सीचे चेअरमन सचिन यादव होते. यावेळी पत संस्थेचे व्हा. चेअरमन योगेश यादव, मार्गदर्शक संचालिका सौ. सुजाता सचिन यादव व संचालक, सभासद, ठेवीदार, खातेदार, हितचिंतक व शहरातील नागरिक, के. बी. उद्योग समूहातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

डिजिटल बँकिंगद्वारे गरुड भरारी प्रेरणादायी

कर्ज वितरणात अनंत अडचणी आहेत, पण आपण नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन काम करता आहात, विशेषतः एकाद्या चांगल्या बँकेपेक्षा उत्तम पद्धतीने डिजिटल बँकिंग सुरु करुन दूरदृष्टी सोबत १४०० अधिकारी/कर्मचारी यांना सोबत घेऊन उत्तम संघटन कौशल्याद्वारे चांगले काम करता आहात,अवघ्या ४/५ वर्षात गरुड भरारी मारली असल्याबद्दल रामभाऊ लेंभे यांनी सचिन यादव व सहकाऱ्यांचे कौतुक केले.

गॅलेक्सी पतसंस्थेचा हेवा वाटावा असे उत्तम काम

  सलग ४०/५० वर्षे या क्षेत्रात काम करताना अनंत अनुभव गाठीशी असल्याने अल्पावधीत या सर्वांवर मात करुन अनोख्या कामकाज पद्धतीद्वारे नावारुपाला आणलेल्या गॅलेक्सी पतसंस्थेचा हेवा वाटावा असे उत्तम काम सचिन यांनी केले आहे, संस्थेची केवळ प्रगती नव्हे एक दर्जेदार आणि इतरांना मार्गदर्शक ठरेल अशी संस्था म्हणून नावलौकिक लाभेल याची खात्री देत रामभाऊ लेंभे यांनी शुभेच्छा दिल्या.

विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून काळजी घेतली

 आर्थिक संस्था चालविताना फार काळजी घ्यावी लागते, कारण ठेवीदारांनी पैसा सांभाळण्याची जबाबदारी मोठ्या विश्वासाने आपल्यावर सोपविलेली असते, त्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून गॅलेक्सी चालविताना कधीही गफलत होऊ दिली नसल्याचे सांगताना कंपनी चालविताना आर्थिक नियोजनाला अत्यंत महत्व असते, येथे के. बी. मध्ये ६ संस्था चालविताना अत्यंत काटेकोर नियोजन करावे लागते, ते उत्तम असल्याने चिंता नाही, तथापि त्यातही

गॅलेक्सी चालविताना ही संस्था वेगळी ठेवून येथील ४८ अधिकारी/कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवून आणि त्यांच्या क्षमता विकसित करुन त्यांच्यावर जबाबदारी दिल्याचे अध्यक्षीय भाषणात सचिन यादव यांनी आवर्जून स्पष्ट केले.

संस्था उभारताना ५ वर्षाचे नियोजन

  संस्था उभारताना पहिल्या ५ वर्षाचे नियोजन व प्रगतीचा आराखडा निश्चित करण्याची आणि आराखड्यानुसार कामकाज होईल यासाठी प्रयत्न करण्याची आपली पद्धत आहे, त्याप्रमाणे आपण नेहमी यशस्वी झाल्याचे सचिन यादव यांनी अभिमानाने सांगितले.

पुणे शहरात अधिक शाखा सुरु करणार

   प्रशिक्षण व विकास यावर सतत विचार व अभ्यास करण्याची पद्धती आपण रामभाऊ लेंभे यांच्या संस्थेत पाहिल्यानंतर त्यावर अभ्यास केला आणि त्यानंतर गॅलेक्सीची प्रत्येक वर्षी एक शाखा सुरु करण्याचा निर्णय बदलून आता आवाका आल्याने यावर्षी ४ शाखांचे नियोजन करुन पुणे शहरात अधिक शाखा सुरु करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सचिन यादव यांनी निदर्शनास आणून दिले.

संस्थेच्या यशाबरोबर समाजाचा विचार केला

  के. बी. उद्योग समूहाच्या माध्यमातून आपण सतत समाजाला काही तरी देण्याचा विचार केला, आणि त्याप्रमाणे संस्था चालविताना संस्थेच्या यशाबरोबर समाजाला काही तरी दिल्याचे सचिन यादव यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

कामाला गती व अचूकता यासाठी डिजिटलायझेशन उपयुक्त

   गॅलेक्सीच्या माध्यमातून कामकाज करताना कोणत्याही ठेवीदार, कर्जदार यांना त्रास होणार नाही, डिजिटलायझेशन स्वीकारण्यास अनेक संस्था घाबरतात पण आपण त्याला प्राधान्य देवून गॅलेक्सी मध्ये, ही कार्यपद्धती प्राधान्याने स्वीकारली त्यामध्ये कामाला गती आणि अचूकता याबरोबरच गैरव्यवहाराला थारा नसल्याचे सचिन यादव यांनी स्पष्ट केले.

अधिकारी कर्मचारी हेच संस्थेचे ब्रँडअंबॅसिडर

संस्था चालविताना, त्यामध्ये कामकाज करताना तेथील अधिकारी/कर्मचारी यांना प्रशिक्षित करुन त्यांच्यावर संस्थेची जबाबदारी देताना त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी विचारात घेऊन त्यांना पुरेसे आणि योग्य वेतन देण्याची काळजी घेतली जात असल्याने ही सर्व मंडळी आपली जबाबदारी उत्साहाने पार पाडीत संस्थेचा ब्रँड विकसित करतात असे सांगताना आमच्या १४०० कामगारांनी किंबहुना आमच्या या कुटुंबीयांनीच आमचा ब्रँड निर्माण केल्याचे सचिन यादव यांनी अभिमानाने सांगितले. कमिन्स पेक्षा अधिक वेतन व सेवा सुविधा देणारी आपली कंपनी असून आगामी काळात आपल्या या कुटुंबाचा विस्तार करुन किमान ५ हजार तरुणांना नोकरीत सामावून घेऊन त्यांच्या कुटुंबांचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचे सचिन यादव यांनी स्पष्ट केले.

संस्था उत्तम चालवून समाजाला काही तरी देणार

 फलटण मध्ये आर्थिक संस्था चालविणे कठीण असल्याचे बोलले जात असले तरी, उत्तम प्रकारे कामकाज आणि योग्य प्रकारे कर्ज वितरण आणि ठेवींना उत्तम संरक्षण असल्याचे स्पष्ट झाल्याने संस्थेचा एनपीए २ टक्के पेक्षा कमी असल्याचे सांगत या कामात रामभाऊ लेंभे यांना ज्येष्ठ बंधू मानून संस्था उत्तम चालविण्याबरोबर समाजाला काही देण्याचा निर्णय आपण निश्चित घेणार असल्याचे सचिन यादव यांनी स्पष्ट केले.

 प्रारंभी संचालक ॲड. लोंढे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात गॅलेक्सी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना चेअरमन सचिन यादव यांचे के. बी. उद्योगाच्या उभरणीतील योगदान आणि त्यांच्या मुळेच शेती व शेतकरी यांच्यासाठी घेतलेले निर्णय याबाबत माहिती देताना आगामी काळात यादव साहेबांच्या नेतृत्वाखाली अधिक प्रगती होत असताना समाजाला नक्की लाभ मिळेल याची ग्वाही दिली.

 भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन तर तज्ञ संचालक लक्ष्मण नामदेव पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER