अज्ञाताविरुद्ध फिर्याद दाखल
शहरातील लक्ष्मीनगर येथेबंद घराचा दरवाजा फोडून अज्ञात चोरट्यानी सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने व 1 हजार रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली असुन शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार व घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण प्रतापराव देशमुख (रा.फ्लॅट क्रमांक 1,रामटेक अपार्टमेंट,लक्ष्मीनगर, फलटण) हे कुटुंबासह दिनांक 1 एप्रिल 2023 ते 5 एप्रिल 2023 दरम्यान दवाखण्यासाठी परगावी गेले होते. दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी प्रवीण प्रतापराव देशमुख हे फलटण येथील घरी आले असता मुख्य दरवाजाचे कुलूप व सेफ्टी दरवाजा तोडलेले दिसले. देशमुख यांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील सामाना अस्थाव्यस्थ केलेले दिसले यानंतर देशमुख यांनी दागिने ठेवलेले लोखंडी व लाकडी कपाट पाहिले असता दोन्ही कपाट तोडलेले दिसले व त्यातील समान अस्थाव्यस्थ केलेले दिसले असता सोन्याचे व चांदीचे दागिने पाहिले असता सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने व १ हजार रुपये रोख रक्कम त्याठिकाणी आढळून आले नाहीत घरात याबाबत अधिक शोध घेतला असता दागिने व रोख रक्कम आढळून आली नाहीत. यानंतर देशमुख यांची खात्री झाली की अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे.याबाबत शहर पोलिस ठाण्यात प्रवीण प्रतापराव देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



















