Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

आर्किटेक्ट जितेंद्र भंडारी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट उपकेंद्राचे पालकमंत्री, गृहराज्यमंत्री, खासदार, आमदारांना निवेदन
टीम : धैर्य टाईम्स
Protest against the attack on architect Jitendra Bhandari
आर्किटेक्ट जितेंद्र भंडारी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या कराड उपकेंद्राकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या घटनेची गंभीर दखल घेऊन पुन्हा कोणत्याही व्यावसायिकासोबत अशा घटना घडू नयेत, त्यादृष्टीने वातावरण निर्मिती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या कराड उपकेंद्राच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

कराड : येथील आर्किटेक्ट जितेंद्र भंडारी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या कराड उपकेंद्राकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या घटनेची गंभीर दखल घेऊन पुन्हा कोणत्याही व्यावसायिकासोबत अशा घटना घडू नयेत, त्यादृष्टीने वातावरण निर्मिती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या कराड उपकेंद्राच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन रविवारी २० रोजी दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या कराड उपकेंद्राच्या वतीने पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील आणि आ. पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आले.
यावेळी उपकेंद्राचे अध्यक्ष सारंग बेलापुरे, इन्स्टिट्यूटच्या महाराष्ट्र विभागाचे निमंत्रित कार्यकारणी सभासद आर्किटेक्ट उदयन कुलकर्णी, उपाध्यक्ष आर्किटेक्ट सलीम शेख, सचिव आर्किटेक्ट प्रियदर्शनी देसले, आर्किटेक्ट अमोल शिंदे, द्वारकानाथ मिस्त्री, प्रियांका कणसे आदी. सभासद उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या कराड उपकेंद्राचे खजिनदार आर्किटेक्ट जितेंद्र भंडारी यांच्यावर बुधवारी हल्ला झाला. यामध्ये त्यांना फॅक्चर होऊन ते वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात पाच दिवसांपासून दाखल आहेत. आर्किटेक्ट जितेंद्र भंडारी हे त्यांच्या व्यावसायिक कामाचे शुल्क मागण्यासाठी त्यांच्या क्लायंटकडे गेले असता त्यांच्यावर हा हल्ला झाला असल्याचे समजते.
एक सुसंस्कृत शहर अशी कराडची ओळख असताना व्यवसायिकांबाबत अशी घटना घडणे अस्वाभाविक आणि शहरासाठी नामुष्कीकारक आहे. या घटनेमुळे सर्व व्यावसायिक व आमचे कुटुंबीय यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कराडमध्ये आम्ही 40 हून अधिक आर्किटेक्ट कार्यरत आहोत. शांतताप्रिय कलासक्त व नेकीने काम करणारा असा हा बहुतांशी वर्ग आहे. दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट या देशभरातल्या आर्किटेक्टच्या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या स्थानिक शाखेकडून आम्ही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवतो.
कराड लोकसभा मतदार संघाचे खा. श्रीनिवास पाटील तसेच पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई तसेच माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण यांना याबाबत संस्थेने निवेदन सादर करत आहे. त्यांनी सदर घटनेची गंभीर दखल घ्यावी. तसेच अशी घटना पुन्हा कोणाही व्यावसायिकासोबत घडू नये, त्यादृष्टीने वातावरण निर्मिती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही सदर निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER