Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

एकच निर्धार - बौद्ध आमदार या घोषणेने फलटण तालूका दुमदूमला

संवाद अभियानास सर्वच गावांत उत्स्फुर्त प्रतिसाद
टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी : 

२५५ फलटण - कोरेगांव हा २००९ मध्ये नव्याने निर्माण झालेल्या राखीव विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या बौध्द समाजातील घटकाला गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसल्याची समाजात खंत निर्माण झाल्याने व आपणास डावलले जात असल्याची भावना निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूकीत बौध्द समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी अवघ्या फलटण -कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील बौध्दांनी " एकच निर्धार ...बौद्ध आमदार ' अशी प्रतिज्ञा घेत तालुक्यात संवाद अभियान सुरू केले असुन या संवाद अभियानास सर्वच गावात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. 

फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील गांवा गांवात संवाद अभियानापुर्वी शहर व तालुक्यातील सामाजिक, राजकीय,शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य,सांस्कृतिक, कृषी, सहकार, पत्रकारिता क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक झाली या बैठकीत एकच निर्धार ... बौध्द आमदार " या संकल्पनेचा नारा देण्यात आला यातुन शहर व ग्रामीण भागात लोकसंवाद, गांव भेट कार्यक्रम निश्चित करण्यात आला.

दि. १३ जुलै पासुन आजअखेर रोज सांयकाळी २५ - ३० प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ७-८ गाडयांचा ताफा गावा - गावात जात आहे, बैठका होत आहेत स्थानिक नागरिक या बैठकांना उपस्थित राहवुन उत्स्फुर्त प्रतिसाद देत आहेत, प्रमुख पदाधिकारी बैठकांना संबोधीत करीत आहेत या वेळी आपल्या समाजाला उमेदवारी मिळाली पाहिजे असा आग्रह करतानाचे चित्र गांवा गांवात दिसत आहे

 बौद्ध समाजाच्या विविध बैठकांनंतर तालुक्यातील विविध जातीधर्म, राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्याशी संपर्क करीत, उमेदवारी मिळवुन देण्यासाठी सहकार्य व पाठींबा व्यक्त करण्याचे आभियान सुरू केले असुन या अभियानास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे.

 विडणी, पिंपरद, आसू, गुणवरे, बरड, आंदरूड, तरडगांव, साखरवाडी,आदर्की, वाठार - निंबाळकर, यासह ३५ हून अधिक गांवात संवाद अभियानास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. जो राजकीय पक्ष बौध्द समाजाला उमेदवारी देईल त्या पक्षाच्या पाठीमागे उभे ठामपणे राहण्याचा निर्धार ग्रामीण भागातील तरुण व ज्येष्ठ ग्रामस्थांनी बोलुन दाखविला आहे. आजपर्यंत बौद्ध समाजाने विविध राजकीय नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद, लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये मतांच्या रूपाने मदत केली त्याचे उत्तरदायित्व म्हणुन त्यांनी आता आमच्या बौद्ध समाजाला विधानसभा उमेदवारी मिळवुन दयावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 

 संवाद दौऱ्यात ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव, वरिष्ठ युवा पत्रकार सचिन मोरे, शक्ती भोसले, सचिन अहिवळे, मधुकर काकडे, विजय येवले, संजय निकाळजे, राजु मारूडा सुधीर अहिवळे, संजय गायकवाड, नंदकुमार मोरे, बी .टी .जगताप, विकास काकडे , दत्ता अहिवळे, संग्राम अहिवळे, सनी काकडे, हरीष काकडे, संदिप काकडे, उमेश कांबळे, शितल अहिवळे, शाम अहिवळे, कपिल काकडे, विकी काकडे, महादेव गायकवाड, अमित भोसले, रोहित माने , सागर अहिवळे आदी मान्यवर सहभागी होते.

महामेळाव्याचे भव्य आयोजन

फलटण - कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील संवाद दौऱ्यानंतर फलटणमध्ये बौध्द समाज बांधवांचा महामेळावा आयोजीत करण्यात येणार असल्याची माहिती संवाद दौरा समितीच्या वतीने देण्यात आली आहे. या महामेळाव्यात फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघातील बौद्ध बांधव मोठया संख्येने उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे अनेक राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER