फलटण प्रतिनिधी -
फलटण येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना फलटण शाखेच्याव अध्यक्षपदी फलटण नगर परिषदेतील स्वच्छता निरीक्षक मुकेश विनायक अहिवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडीचे पत्र संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल पवार यांनी 1 मे महाराष्ट्र दिनी दिले.
संघटनेच्या कार्याध्यक्षपदी शिवभोला भालेराव काकडे, सचिन रामचंद्र घोलप, उपाध्यक्षपदी प्रकाश लक्ष्मण राठोड, विजय सुनिल अहिवळे, मंगेश मधुकर माने, नितीन देविदास वाळा, शिवेन्द्रराज श्रीकांत कांबळे तर सचिवपदी रमेश चुनिलाल वाघेला, अमोल सुरेश सरतापे, भारत प्रकाश काकडे यांची निवड करण्यात आली. संघटनेचे कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. वर्धमान विनायक अहिवळे ॲड. मनोज बाळासाहेब जावळे ॲड. शितल दादा अहिवळे असणार आहेत.










