Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे

टीम : धैर्य टाईम्स

पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याची नाही, तर अन्यायाला वाचा फोडण्याची जबाबदारी आहे - आणि ही जबाबदारी गेली ४२ वर्षे प्रामाणिकपणे पार पाडणारे नाव म्हणजे ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे.


सन १९८४ मध्ये बारामती येथून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक केकावली मध्ये कार्यकारी संपादक म्हणून शामराव अहिवळे यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. अनिल साबळे आणि माजी खासदार अमर साबळे यांच्या संपादनाखाली प्रसिद्ध होणाऱ्या या साप्ताहिकातून त्यांनी आपल्या लेखणीची धार सिद्ध केली. त्यानंतर १९८७ साली फलटण येथे त्यांनी साप्ताहिक गंधवार्ता ची स्थापना केली. त्यांच्या नेतृत्वाखाली हे वृत्तपत्र सातत्याने आणि यशस्वीपणे पुढे जात राहिले. १९९४ मध्ये गंधवार्ताचे दैनिकात रूपांतर करून त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला. 


मागील ४२ वर्षांपासून शामराव अहिवळे यांनी निर्भीड पत्रकारितेचा आदर्श जपला आहे. आपल्या लेखणीतून त्यांनी नेहमीच समाजातील ज्वलंत प्रश्न मांडले. शासकीय अधिकाऱ्यांची लाचखोरी, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतेचे प्रश्न, अतिक्रमण, आरोग्य सुविधा तसेच महिलांवरील अन्याय अशा विविध विषयांवर त्यांनी सातत्याने लेखन केले. त्यांच्या लेखणीमुळे अनेक प्रश्नांना न्याय मिळाला आणि प्रशासनाला जागे केले.


शामराव अहिवळे यांच्या राजकीय लिखाणाची खासियत म्हणजे त्यांच्या म्हणी, पद्यात्मक हेडिंग आणि प्रभावी मांडणी. राजकिय नेतेमंडळीच्या समाज उपयोगी निर्णयांना प्रसिद्धी देऊन पाठबळ दिले तर चुकीच्या निर्णयाचा वृत्तपत्राच्या माध्यमातून जाहीर पंचनामा केला. यामध्ये कित्येक वेळा त्यांच्यावर वर खोट्या केसेस करण्यात आल्या परंतु न्यायालयाने सत्याच्या बाजूने निर्णय देऊन त्यांचे निर्दोषत्व सिद्ध केले.


पत्रकारितेबरोबरच त्यांनी संघटनात्मक कार्यातही मोलाचे योगदान दिले. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे संचालक तसेच सातारा जिल्हा वृत्तपत्र मालक-मुद्रक-संपादक संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. पत्रकारांच्या हक्कांसाठी विविध आंदोलनात सहभाग घेतला, पत्रकार हल्ला विरोधी कायद्यासाठी लढा दिला तसेच फलटण एस.टी. आगाराच्या अनागोंदी कारभाराविरोधात उभ्या राहिलेल्या आंदोलनातही सक्रिय सहभाग नोंदवला.


आंबेडकरी चळवळीत देखील शामराव अहिवळे यांनी मोलाचे योगदान दिले. फलटण शहरात दलित पॅंथरच्या स्थापनेपासून त्यांनी सामाजिक चळवळीत सहभाग घेऊन न्याय मिळवण्यासाठी लढा दिला. अन्यायाविरोधात उभारण्यात आलेल्या चळवळींचे लिखाण करून या चळवळींना, वृत्तपत्राच्या माध्यमातून शासन दरबारी पोहचवण्याचे महत्वाचे काम त्यांनी लिखाणातून केले.


शामराव अहिवळे यांच्या कार्याचा गौरव अनेक पुरस्कारांनी करण्यात आला आहे. २०१२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ, फलटण यांच्याकडून सन्मान, २०१७ मध्ये भीमस्फूर्ती पुरस्कार, २०१९ मध्ये मूकनायक पुरस्कार आणि २०२३ मध्ये महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा प्रतिष्ठित ज्येष्ठ संपादक दर्पण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.


 आजच्या वाढदिवसानिमित्त

समाजहितासाठी झटणाऱ्या, अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे उभे राहणाऱ्या आणि पत्रकारितेचा आदर्श जपणाऱ्या ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

त्यांच्या लेखणीला अजून अधिक बळ मिळो आणि समाजासाठी त्यांचे कार्य असेच प्रेरणादायी ठरो, हीच सदिच्छा. 

सचिन मोरे, जेष्ठ पत्रकार, फलटण 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER