शिबिरामध्ये आधार नोंदणी, आधार अद्यावत करणे तसेच संबंधित सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. ग्रामस्थांना त्यांच्या गावातच ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने समाधान व्यक्त केले
फलटण दि. ६ जून : ग्रामस्थांच्या सोयीसाठी लोकनियुक्त व कार्यसम्राट सरपंच सागर कांतीलाल अभंग यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत विडणी व भारतीय डाक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय, विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पंचायत समिती सदस्य सचिन गजानन अभंग (अध्यक्ष), उपसरपंच सौ. मनीषा दीपक नाळे तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ. वैशाली शरद कोल्हे, दत्तात्रय भिवा अबदागिरे आणि कैलास कोंडीबा जगताप उपस्थित होते.
यावेळी गावचे माजी सरपंच शरदराव कोल्हे, अनिल विठ्ठलराव शेंडे, भारतीय डाक विभागाचे चिदानंद दिंडुरे, दत्तात्रय ताटे, योगेश माने, संतोष नेरकर तसेच पोस्ट विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी अंकुशराव टेंबरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
शिबिरामध्ये आधार नोंदणी, आधार अद्यावत करणे तसेच संबंधित सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. ग्रामस्थांना त्यांच्या गावातच ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
ग्रामस्थांच्या सोयीसाठी आयोजित करण्यात आलेले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.










