Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

वृक्ष संवर्धन करणे भविष्याच्या दृष्टीने गरजेचे : आ. श्रीमंत रामराजे

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी : जागतिक तापमान वाढ आणि त्यातून निर्माण होणारी अनेक संकटे टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करणे भविष्याच्या दृष्टीने गरजेचे असल्याचे सांगून, बिल्डर्स असोसिएशन, वॉकर्स ग्रुप, सगुणामाता कन्स्ट्रक्शन यांनी जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून शहरात वृक्षारोपण मोहिम सुरु केल्याबद्दल समाधान व्यक्त करीत या सर्वांना आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी धन्यवाद दिले, त्यांचे कौतुक केले. 

माझी वसुंधरा अभियान आणि जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून डॉ. महेश बर्वे यांनी फलटण शहर व तालुक्यात एकाच दिवशी - एकाच वेळी एक लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेवून आपला गाव वृक्षोत्सव आणि हर घर झाड उपक्रमांतर्गत केलेल्या आवाहनानुसार बिल्डर्स असोसिएशन, वॉकर्स ग्रुप आणि सगुणामाता कन्स्ट्रक्शन यांनी संयुक्तरित्या विमानतळ व न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले, त्याचा शुभारंभ आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आला, त्यावेळी आ. दिपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, संचालक महादेव माने, , राम नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य बिल्डर असोसिएशन माजी अध्यक्ष रणधीर भोईटे, बिल्डर असोसिएशन संस्थापक अध्यक्ष प्रमोद निंबाळकर, विक्रम शेठ झांजुर्णे, महेश गरवालिया, बिल्डर असोसिएशन विद्यमान अध्यक्ष किरण दंडीले, उपाध्यक्ष सुनील सस्ते, सचिव स्वीकार मेहता, खजिनदार संजय डोईफोडे, दिलीप शिंदे, राजीव नाईक निंबाळकर, डॉ. महेश बर्वे, कुमार भट्टड, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य बाळासाहेब गंगावणे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, सामाजिक वनीकरणचे दिगंबर जाधव, नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यासह विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी/विद्यार्थीनी आणि फलटण शहर वासीयांची उपस्थिती होती.

आगामी काळात सर्वांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाची ही मोहिम फलटण शहर व तालुक्यात प्रभावी रीतीने राबवावी, त्यामध्ये तरुण आणि महिलांसह विद्यार्थी/विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन फलटण हा सर्वाधिक वृक्ष लागवड असलेला तालुका बनवावा असे आवाहन आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले.

तापमान वाढीमुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून देताना आपल्या भागातील सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जून पासून सुरु होणारा पाऊस आता जुलै महिन्याची ११ तारीख आली तरी धरण क्षेत्रात अद्याप दमदार पावसाला सुरुवात नाही, कोठेही २/३ मि. मी. पेक्षा अधिक पाऊस झाला नाही, परिणामी पाणी टंचाई समस्या निर्माण झाली असून आतापासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु झाले आहेत, शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे या बाबी लक्षात घेऊन प्रत्येकाने पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करावेत असे आवाहन आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून फलटण शहर व तालुक्यात १ लाख झाडे लावण्याचा विविध संस्था/संघटनांचा निर्धार निश्चित उपयुक्त आहे, ग्रामस्थांनी त्यांना उत्तम साथ केल्याचे चित्र प्रेरणादायी असल्याचे सांगताना १ लाखापेक्षा अधिक झाडे लावता आली असती तथापि पावसाने ओढ दिल्याने आगामी काळात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर ही मोहिम अधिक प्रभावी करता येईल असे प्रतिपादन आ. दिपकराव चव्हाण यांनी केले.

जागतिक लोकसंख्या दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने वृक्षारोपण करण्याची संकल्पना घेऊन डॉ. महेश बर्वे यांनी गेला सुमारे महिनाभर समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून सर्वांना आपला गाव वृक्षोत्सव आणि हर घर झाड संकल्पना समजावून दिली असल्याने आज शहर आणि ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होत असल्याचे निदर्शनास आणून देत शहरातील खुल्या जागा, शासकीय कार्यालय परिसर, गृहनिर्माण सोसायट्या परिसर येथे शासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होईल यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.

 ग्लोबल वॉर्मिगच्या प्रश्नात आ. श्रीमंत रामराजे यांनी प्रचंड अभ्यास केला आहे, त्याबाबत सर्वांना माहिती व्हावी यासाठी त्यांनी लायन्स क्लब व अन्य संस्थांच्या माध्यमातून येथे परिषदा घेतल्या, त्या क्षेत्रातील तज्ञांना येथे निमंत्रित करुन येथील संस्था, संघटना पदाधिकारी, शासकीय अधिकारी, शालेय विद्यार्थी, प्राध्यापक यांना या विषयाचे गांभीर्य समजावून देत बिघडलेला पर्यावरणाचा समतोल सुधारण्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनावर अधिक भर देण्याचे आवाहन त्यांनी केले, त्यातून फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होत असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

आपला गाव वृक्षोत्सव आणि हर घर झाड संकल्पनेला फलटण शहर व तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने एकाच दिवशी, एका वेळी सर्व स्तरावर वृक्षारोपण करण्याची आपली योजना यशस्वी झाल्याचे सांगत गोविंद फौंडेशन, बिल्डर्स असोसिएशन, क्रेडाई, मुधोजी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, मुधोजी महाविद्यालय, डॉक्टर्स असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, लायन्स ग्रुप, जायंटस ग्रुप, मुधोजी क्लब, तालुक्यातील सहकारी संस्था, ग्रामपंचायती, विकास सोसायट्या, तरुण मंडळे, गणेशोत्सव मंडळे, स्वयंसेवी संस्था वगैरे विविध समाज घटकांनी आजच्या या उपक्रमात सहभागी होऊन उत्स्फूर्त साथ केल्याचे सांगत डॉ. महेश बर्वे यांनी सर्वांना धन्यवाद दिले.

जागतिक लोकसंख्या दिनी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याच्या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आज सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आला असून फलटण हे वृक्षारोपण क्षेत्रातील रोल मॉडेल ठरावे यासाठी सर्वांनी यापुढेही अशीच साथ करावी अशी अपेक्षा व्यक्त करीत डॉ. महेश बर्वे यांनी सर्वांना धन्यवाद दिले.

बिल्डर्स असोसिएशन, वॉकर्स ग्रुप आणि सगुणामाता कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त सहभागाने आज विमानतळ परिसरातील प्रशस्त रस्त्याच्या दोन्ही बाजूला, न्यायालय परिसरात सुमारे ३५० झाडे लावण्यात आली असून त्यांना ट्री गार्ड आणि ठिबक सिंचन द्वारे कायम स्वरुपी पाण्याची सोय करण्यात येत असल्याचे प्रमोद निंबाळकर यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

मुधोजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी आजच्या वृक्षारोपण मोहिमेत सक्रिय सहभाग घेत वृक्षारोपण केले, त्यावेळी संकीता जगन्नाथ वीरकर, भक्ती शामराव चव्हाण, प्रीती रामदास जाधव या इयत्ता १२ वी कॉमर्स शाखेतील विद्यार्थिनींनी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन चळवळीत समाजाच्या प्रत्येक घटकाने सहभागी होऊन आपले योगदान दिले पाहिजे याची जाणीव झाल्यानेच आम्ही या चळवळीत सहभाग घेतला असून आगामी काळात ही चळवळ अधिक वेगवान करुन अधिकाधिक झाडे लावण्याचा निर्धार केला आहे

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER