Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त

आपली फलटण मॅरेथॉन २०२४ - २५ : रविवार दि. ५ जानेवारी २०२५ रोजी

टीम : धैर्य टाईम्स

फलटण | धैर्य टाईम्स |

जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण आणि रोबोटिक्स सेंटर, फलटण यांच्या माध्यमातून प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही आपली फलटण मॅरेथॉनचे आयोजन दि. ५ जानेवारी २०२५ रोजी करण्यात येत असून नाव नोंदणी करुन सहभागी होण्याचे आवाहन डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी केले आहे.

गेली ७ वर्षे प्रतिवर्षी आपली फलटण मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत असून प्रत्येकवर्षी लोकांचा उत्साह वाढतच असल्याचे निदर्शनास आणून देत लोकांना व्यायामाची सवय लागावी, सगळ्यांचे आरोग्य उत्तम रहावे या शुद्ध हेतूनेच आपण, ही मॅरेथॉन सुरु केली आहे. त्यामध्ये विविध वयोगटातील स्त्री - पुरुष, तरुणांसह लोकांचा वाढता सहभाग समाधान देणारा असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी आवर्जून सांगितले.

 आपली फलटण मॅरेथॉनचे बक्षीस वितरण आणि उपस्थितांना मार्गदर्शन असा दुहेरी उद्देश ठेवून प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आतापर्यंत निमंत्रित करण्यात आले, त्यामध्ये डॉ. शरद हर्डीकर, स्वर्गीय सिंधुताई सपकाळ, आयपीएस विश्वासराव नांगरे पाटील, खा. अमोल कोल्हे, डॉ. प्रकाश बाबा आमटे व सौ. मंदाकिनी आमटे, ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे, आयपीएस कृष्णप्रकाश वगैरे मान्यवरांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्याला मार्गदर्शन व बक्षीस वितरण केले असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी निदर्शनास आणून दिले आहे. 

यावर्षी नाटककार, अभिनेता, दिग्दर्शक, चित्रपट निर्माता, बिग बॉस फेम आणि सेलिब्रिटी महेश मांजरेकर यांना उपस्थित श्रोते, मॅरेथॉनमध्ये सहभागी विविध वयोगटातील तरुण वर्गासह नागरिक स्त्री - पुरुष यांना मार्गदर्शन आणि विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यासाठी निमंत्रित करण्यात आल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी सांगितले.

 रविवार दि. ५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ६ वाजता सजाई गार्डन कार्यालय, विमानतळ, फलटण येथून सुरु होणाऱ्या आपली फलटण मॅरेथॉन २०२४ - २५ चा शुभारंभ महेश मांजरेकर व अन्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

 आपली फलटण मॅरेथॉन मध्ये एकूण ३ विभागातील सहभागी स्पर्धकांपैकी पुरुष व महिला असे प्रत्येकी पाहिले ३ क्रमांकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे दिली जाणार आहेत. एकूण १८ बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यामध्ये पहिले बक्षीस १० हजार रुपये, दुसरे बक्षीस ७ हजार रुपये, तिसरे बक्षीस ५ हजार रुपये असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी सांगितले.

   मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्यांना आकर्षक फिनिशर मेडल तसेच मॅरेथॉन मध्ये सहभागी रनर्सना प्रत्येकी एक मॅरेथॉन किट दिले जाणार आहे, ज्या मध्ये टाईम चीप बिब, टी शर्ट, एनर्जी बार, टोपी आणि एक उत्तम भेट वस्तू असणार आहे.

  आपली फलटण मॅरेथॉन २०२४ - २५ मध्ये आपला सहभाग नोंदवा आणि तुमच्या आयुष्याचा निरोगी आणि आनंदी प्रवास सुरु करा असे आवाहन डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी केले आहे.

  नाव नोंदणीसाठी दि. २० डिसेंबर २०२४ पर्यंत प्रत्येकी ७५० रुपये भरुन www.joshihospitalpvtltd.com या वेबसाईट वर करावी असे सुचविण्यात आले आहे.

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER