Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात पिंपरद येथे सौ. सुषमा ताई मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांनी घरोघरी जात केला प्रचार अजितदादा यांच्या सारखे कणखर नेतृत्व पुन्हा घडणार नाही,शेतकऱ्याच्या मुलाला विधानसभेत पाठिंबा दिला - आमदार सचिन पाटील

पावसाळ्यात होणारे संभाव्य आजार व त्याची लक्षणे

टीम : धैर्य टाईम्स
उघड्यावरचे दुषित खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने.तसेच दुषित हात न धुता खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने टायफॉईड/विषमज्वर, कावीळ, अतिसार/हगवण यांसारखे आजार पसरतात. टायफॉईडमध्ये  ताप, डोकेदुखी, पोटदुखी, मळमळणे, उलटी होणे, थकवा येणे ही लक्षणे दिसून येतात.

पावसाळा हा ऋतु प्रत्येकाला हवाहवासा वाटतो पण पावसाळा आला की आजारपणही आलंच. पावसात जमिनीवर साचणाऱ्या दुषित पाण्यामुळे अनेक आजार पसरतात.  पावसाळ्यात अनेकदा संसर्गजन्य आजारांसह  ताप, सर्दी व खोकल्याचे रूग्ण वाढतात.   हे आजार टाळायचे असल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हा एकमेव पर्याय आहे. यासाठी पौष्टिक आहाराच्या सेवनासह आरोग्याकडेही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

             पावसाळ्यात होणारे विविध आजार व त्याची लक्षणे खालीलप्रमाणे

 फ्लू, सर्व सामान्य सर्दी, एच.वन. एन. वन., कोरोना,  अशा विविध विषाणूमुळे श्वसनाचे आजार होतात. याची सर्वसामान्य लक्षणे ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे अंगदुखी, थकवा येणे, धाप लागणे आहेत. या आजारांचे संक्रमण बोलताना, शिंकताना अथवा खोकताना थुंकीवाटे उडणाऱ्या तुषारांतून, दुषित पृष्ठभाग (दरवाजा, टेबल, रेलिंग अथवा अशा गोष्टींना स्पर्श केल्यानंतर तोच हात न धुता चेहरा, डोळे, नाक, तोंड यांना लावल्यानंतर), गर्दीच्या ठिकाणी वावरणे यातून होते.

उघड्यावरचे दुषित खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने.तसेच दुषित हात न धुता खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने टायफॉईड/विषमज्वर, कावीळ, अतिसार/हगवण यांसारखे आजार पसरतात. टायफॉईडमध्ये  ताप, डोकेदुखी, पोटदुखी, मळमळणे , उलटी होणे, थकवा येणे ही लक्षणे दिसून येतात. तर कावीळ झाल्यास ताप, डोळे व  अंग पिवळे पडणे, गडद पिवळ्या रंगाची लघवी होणे पोटदुखी, मळमळणे , उलटीहोणे, थकवा अशी लक्षणे आढळतात. अतिसार किंवा हगवण लागल्यास जुलाब होणे, पोटदुखी,  मळमळणे , उलटी होणे, थकवा येणे, जुलाबातून रक्त पडणे इ. लक्षणे आढळतात.

पावसाळ्यामध्ये अडगळीची ठिकाणे डबकी, टायर अशा ठिकाणी पाणी साचून त्यामध्ये डासांची उत्त्पती वाढते. एडीस इजिप्ती या डास चावल्यास डेंगू, चिकनगुन्या हे आजार होण्याचा धोका वाढतो. हा डास स्वच्छ साठवलेल्या पाण्यात अंधाऱ्या जागी वाढतो तसेच दिवसा चावतो. डेंगू मध्ये अचानक थंडी वाजून ताप येणे हाडे व सांधे दुखणे,  डोळ्यांच्या खोबणीत दुखणे, गंभीर स्वरूपाच्याडेंगू मध्ये रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे लालसर पुरळ येणे, नाक/त्वचा/हिरड्या/गुदद्वार अशा जागांमधून रक्तस्त्राव होणे अशी लक्षणे दिसून येतात.

चिकनगुन्या झाल्यास थंडी वाजून ताप येणे, सांधे दुखणे खासकरून हात व पायांच्या बोटांचे सांधे, थकवा अशी लक्षणे दिसून येतात. अॅनाफिलीस डासामार्फत मलेरिया हा आजार पसरतो. हा डास साचलेल्या डबक्या मध्ये वाढतो. मलेरियामध्ये थंडी वाजून ताप येणे, डोकेदुखी, मळमळणे, चक्कर येणे अशी लक्षणे जाणवतात. पुराच्या पाण्यामध्ये उंदीर घुशी अशा प्राण्यांची लघवी मिसळलेली असते. अशा पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे पायाच्या भेगामधून, तोंड, डोळे व नाक इत्यादी वाटे लेप्टोस्पायरोसिस आजार होतो. थंडी वाजून ताप येणे, डोकेदुखी, मळमळणे, चक्कर येणे, डोळे पिवळसर व लालसर होणे रक्तस्त्राव होणे लक्षणे जाणवतात.

आजाराची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावा. बरे वाटले तरी दिलेल्या औषधांचा डोस पूर्ण करावा. पुरेशी विश्रांती घेतल्यास शरीरास आजाराशी प्रतिकार करण्यास अवधी मिळतो. पाणी/नारळ-पाणी/सूप/ओ.आर.एस. चे पाणी अशा द्रव पदार्थांचे सेवन करावे. तीव्र वेदना, वारंवार उलट्या होणे, चक्कर येणे, धाप लागणे, झटके येणे, रक्तस्त्राव अशी गंभीर लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल व्हावे.

संकलन जिल्हा माहिती कार्यालय,
                    सातारा 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER