Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे १५ ऑगस्ट रोजीचे जागरण -गोंधळ आंदोलन तात्पुरते स्थगित 

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनीधी - स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा व फलटण तालुका तर्फे १५ ऑगस्ट रोजी करण्यात येणारे जागरण -गोंधळ आंदोलन तहसिलदार अभिजित जाधव यांच्याबरोबर झालेल्या चर्चा नंतर झालेल्या कारवाईमुळे आंदोलन तात्पुरते स्थगित केले असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हाध्यक्ष संग्रामसिंह उर्फ धनंजय संपतराव महामुलकर यांनी दिली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा व फलटण तालुका तर्फे विविध मागण्याबाबत महसूल विभागाच्या विविध कार्यालयास स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी तक्रार अर्ज दिला होता परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेली नसल्याने १५ ऑगस्ट रोजी सकाळी तहसील कार्यालय फलटण येथे महसूल विभागाच्या विरोधात संघटना जागरण -गोंधळ आंदोलन करणार होते. आज दिनांक १३ ऑगस्ट रोजी सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर,फलटण तालुका अध्यक्ष नितीन यादव,जिल्हा सरचिटणीस डॉक्टर रवींद्र घाडगे या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी तहसिलदार अभिजित जाधव यांच्याबरोबर चर्चा झाली असता मागणी मुद्यावर कार्यवाही करण्यात आली.

फलटण तालुक्यातील शेती महामंडळ वर्ग २ जमिनी वर्ग १ करण्यासाठी घेतल्या प्रकरणी महसूल अव्वल कारकून निलेश भोसले, ऋषी भोसले सांगवी कोतवाल व साखरवाडी येथील तलाठी कार्यालयात काम करणाऱ्या खाजगी कर्मचारी शामा भोसले याची व त्याच्या मालमत्तेची लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांना महसूल विभागाने चौकशी करणेबाबत आदेश देण्यात यावेत. या प्रकरणी कार्यवाही करण्यासाठी १५ दिवसाची मुदत अभिजीत जाधव तहसिलदार फलटण यांनी मागितली आहे.खाजगी कर्मचारी शामा भोसले यांना यापुढे साखरवाडी तलाठी तसेच मंडल अधिकारी कार्यालयात काम न करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच निलेश भोसले यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी शेती महामंडळाचे काम विलास पडोळकर यांना देण्यात आले आहे.

तहसील कार्यालय फलटण येथे तहसील कार्यालयातील विविध विभागातील लिपिक व अव्वल लिपिक यांनी निवासी नायब तहसीलदार व नायब तहसीलदार यांना हाताशी धरून महाराष्ट्र शासनाच्या धोरणाच्या व नियमाच्या विरोधात जाऊन अनेक खाजगी कर्मचाऱ्यांची नेमणूक चौकशी व्हावी व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. तत्काळ तहसील कार्यालयात काम करणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांना काढण्यात यावे.खाजगी कर्मचारी नेमल्या गेल्या प्रकरणी निलेश भोसले अव्वल लिपिक,प्रशांत शिंदे लिपिक याचा सहभाग असून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे या प्रकरणी कार्यवाही करण्यासाठी १५ दिवसाची मुदत अभिजीत जाधव तहसिलदार फलटण यांनी मागितली आहे. सर्व खाजगी कर्मचारी यांना यापुढे तहसील कार्यालयात कामवर न येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

फलटण तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या रींकेश खराडे, तडवळे कोतवाल, ऋषी भोसले सांगवी कोतवाल, विजय दुधेबावी कोतवाल, ढावरे पाडेगाव कोतवाल, गुरव मुंजवडी कोतवाल, गोरे निरगुडी कोतवाल, गोपी जगताप फडतरवाडी कोतवाल, भीमराव चव्हाण राजुरी निवृत्त कोतवाल, सागर काकडे खाजगी कर्मचारी यांची नेमणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. सर्व शासकीय कोतवालांना त्यांच्या नेमणुकीच्या तलाठी कार्यालयात रुजू करण्याचे आदेश व्हावे कोतवाल नेमणूक प्रकरणी तत्काळ चौकशी करण्यात यावी.

या प्रकरणी अभिजीत जाधव तहसिलदार फलटण यांनी १/८/२०२४ रोजी दोन कार्यालयीन आदेश काढून रेकॉर्ड विभागात व तहसील विभागात काम काम करणाऱ्या वरील सर्व कोतवालांना त्यांच्या मूळ पदावर कार्यमुक्त करण्यात आले आहे.

फलटण तालुक्यातील अनेक तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयात शासकीय कोतवाल असताना अनेक खाजगी कर्मचारी कोतवाल म्हणून काम करणाऱ्या खाजगी कर्मचारी व खाजगी कोतवाल यांच्यावर तत्काळ चौकशी आणि कारवाई करण्यात यावी. या प्रकरणी कार्यवाही करण्यासाठी १५ दिवसाची मुदत अभिजीत जाधव तहसिलदार फलटण यांनी मागितली आहे. सर्व खाजगी कर्मचारी यांना यापुढे तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयात कामवर न येण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. 

फलटण तालुक्यातील तहसील कार्यालयातील रेकॉर्ड विभागातील ऑफलाईन स्वरूपात नक्कल स्वरुपात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी. तत्काळ ऑफलाईन नकला देणे बंद करण्यात यावे यापुढे फक्त संगणकृत स्कॅन केलेले नकला द्याव्यात. या प्रकरणी कार्यवाही करण्यासाठी १५ दिवसाची मुदत अभिजीत जाधव तहसिलदार फलटण यांनी मागितली आहे. सर्व मुद्द्यांवर कारवाई सुरू केल्यामुळे १५ ऑगस्ट २०२४ रोजी आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना तर्फे करत असलेले जागरण -गोंधळ आंदोलन तात्पुरते मागे घेत असून वरील प्रलंबीत मागण्यावर १५ दिवसात उचित कारवाई न झाल्यास पुन्हा जागरण -गोंधळ आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती प्रसिध्दी पत्रकान्वये स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हाध्यक्ष संग्रामसिंह उर्फ धनंजय संपतराव महामुलकर यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER