बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी देवा मन्नाराम सोलंकी (रा.संगमनगर) याच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयित आरोपी याने मारहाण केली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
सातारा : बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी देवा मन्नाराम सोलंकी (रा.संगमनगर) याच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयित आरोपी याने मारहाण केली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
ही घटना दि. 27 रोजी रात्री घडली आहे. संशयिताने महिलेचा विनयभंग केल्यानंतर त्या महिलने आरडाओरडा करताच संशयित तेथून पळून जावू लागला. यावेळी एकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली आहे.











