Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

विठ्ठला… समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी कोरोनासह सर्व अडचणी दूर कर - मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा
टीम : धैर्य टाईम्स
मागील दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी वारी होऊ शकलेली नाही. त्यामुळे या वर्षी 10 लाखापेक्षा अधिक वारकरी पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. लाखो वारकरी विठू नामाचा जयघोष करत मोठ्या उत्साहाने  चालत आलेले आहेत. या सर्व वारकऱ्यांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत

पंढरपूर दि. 10 :-आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची  परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे  सकारात्मक वातावरण तयार होते. अशा वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यात राज्य शासन कोठे ही कमी पडणार नसल्याची ग्वाही  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.   समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी राज्यसमोरील कोरोनासह सर्व अडचणी दूर करण्याचे साकडे त्यांनी विठ्ठला चरणी घातले.
आषाढी एकादशी निमित्त श्री. शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ.लता शिंदे यांनी  मानाचे वारकरी मु.पो.  रुई, ता.गेवराई, जि.बीड  येथील मुरली भगवान नवले (52) आणि सौ. जिजाबाई मुरली नवले (47) या दाम्पत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची  महापूजा  केली. महापूजेनंतर विठ्ठल मंदिर समितीच्यावतीने आयोजित मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार कार्यक्रमात  ते बोलत होते.

 यावेळी मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय,मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर,यांच्यासह समितीचे अन्य सदस्य, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मागील दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी वारी होऊ शकलेली नाही. त्यामुळे या वर्षी 10 लाखापेक्षा अधिक वारकरी पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. लाखो वारकरी विठू नामाचा जयघोष करत मोठ्या उत्साहाने  चालत आलेले आहेत. या सर्व वारकऱ्यांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. शासन शेतकरी, वारकरी शेतमजूर व कामगार यांच्यासह राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

समाजातील प्रत्येक घटकाला विकासाचा लाभ मिळवून देणार

राज्यात कृषी, उद्योग, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रासह अन्य सर्व क्षेत्रात चांगली कामे केली जाणार असून विकासाचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच शासन सर्वसामान्याचे आहे  ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याच्यादृष्टीने प्रयत्न राहतील असे त्यांनी सांगितले.

राज्यात या वर्षी पावसाला उशीरा सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी व महापुराची परिस्थिती निर्माण झालेली असली तरी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. चांगला पाऊस पडल्यास चांगले पीक येऊन शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल.  शासन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील 12 कोटी जनतेच्यावतीने महापूजा

      राज्यात आषाढी एकादशीची वारी एक महापर्व असून या वारीला एक मोठी परंपरा लाभलेली आहे.  आषाढी एकादशीला महापूजा करण्याचा सन्मान मिळाल्याने हा दिवस जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राज्यातील १२ कोटी जनतेच्यावतीने आपण ही शासकीय महापूजा केली असल्याचे सांगून त्यांनी राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

वारकरी सन्मान व एसटी मोफत पास वितरण

आजच्या शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मानाच्या वारकऱ्यांना राज्य परिवहन  महामंडळाकडून वर्षभरासाठी देण्यात येणाऱ्या मोफत पासचे वितरणही श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक सुजय जाधव, उपमहाव्यवस्थापक अजित गायकवाड व विभाग नियंत्रक विलास राठोड  उपस्थित होते.मुख्यमंत्री शिंदे व मान्यवरांच्या हस्ते 'रिंगण' या वारी विशेषांकाचे प्रकाशन देखील या प्रसंगी करण्यात आले.

निर्मल दिंडी पुरस्कार वितरण

पंढरीची वारी ही महाराष्ट्राची प्राचीन आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारीत सहभागी होणाऱ्या अनेक दिंड्या सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत असतात. या दिंड्यांचा आदर्श घेऊन 'निर्मल वारी हरित वारी ' अभियानामध्ये नागरिकांचा  सहभाग वाढवावा या उद्देशाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्यामार्फत 'श्री विठ्ठल निर्मल दिंडी' पुरस्कार  देण्यात येतो.  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्री संत तुकाराम महाराज कोकण दिंडी पनवेल जिल्हा रायगड (एक लाख रुपये व सन्मानचिन्ह), द्वितीय क्रमांक-वै.ह भ. प. भाऊसाहेब महाराज खरवळकर दिंडी, मु.पो.शेरा, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर  (७५ हजार व सन्मान चिन्ह) तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्री संत जगनाडे महाराज दिंडी घोटी बुद्रुक जिल्हा नाशिक (५० हजार व सन्मान चिन्ह) दिंडीला प्रदान करण्यात आले. तसेच 'ग्रीन बिल्डिंग' पुरस्काराचे वितरणही या वेळी करण्यात आले.

प्रारंभी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे यांचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. श्री औसेकर महाराज यांनी प्रास्ताविक केले, तर आभार समिती सदस्य प्रकाश जंजाळकर महाराज यांनी मानले.

यावेळी खासदार सर्वश्री डॉ.श्रीकांत शिंदे, बंडू जाधव, आमदार सर्वश्री दीपक केसरकर, तानाजी सावंत, दादा भुसे, संजय राठोड, शहाजीबापू पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, भरतशेठ गोगावले, रविंद्र फाटक, राणा जगजीतसिंह पाटील,माजी आमदार विजय शिवतारे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्यासह समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER