Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी

शिवसेनेला कोणाच्याही कुबड्यांची गरज नाही : मंत्री उदय सामंत

कराड पालिकेतही भगवा फडकवू - शंभूराज देसाई
टीम : धैर्य टाईम्स
Shiv Sena doesn't need anyone's crutches: Minister Uday Samant
महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यूतुबे राज्याला विकासाची नवी दिशा दिली आहे. ती दिशा सातारा जिल्ह्याच्या विकासापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पेटून उठले पाहिजे. दोन-तीन महिन्यांवर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका आल्या आहेत.

कराड : महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यूतुबे राज्याला विकासाची नवी दिशा दिली आहे. ती दिशा सातारा जिल्ह्याच्या विकासापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पेटून उठले पाहिजे. दोन-तीन महिन्यांवर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका आल्या आहेत. त्यासाठी शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आठवड्यातील फक्त दोन दिवस पक्षासाठी देऊन कार्य केल्यास शिवसेनेला सत्तेसाठी कोणाच्याही कुबड्यांचा आधार घेण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात शनिवारी शिवसेनेच्या वतीने कराड शहर, दक्षिण, उत्तर व पाटण तालुका पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या शिव संपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार, तालुकाध्यक्ष रामभाऊ रैनाक, सातारा-सांगली संपर्कप्रमुख शंकर संकपाळ, कराड शहर प्रमुख शशिराज करपे, महिला जिल्हा संघटिका अनिता जाधव, कुलदीप क्षीरसागर आदी पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले, कोरोना, अतिवृष्टी, महापूर अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौशल्यपूर्वक काम केले. त्याची जागतिक पातळीवर दखलही घेण्यात आली आहे. परंतु सध्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाईचा भडका उडाला असून त्यामध्ये सर्वसामान्य जनता होरपळली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी उद्धव ठाकरेंचे नेतृत्व देशव्यापी करायला हवे. त्यानुसार धोरणात्मक काम सुरू असून फक्त साताराच नव्हे तर महाराष्ट्रात शिवसेनेची स्वबळाची तयारी सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने स्थानिक पातळीवर आपापली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणे गरजेचे असून कराड कराड नगरपालिकेतही नक्कीच भगवा फडकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, प्रत्येक गावागावापर्यंत व घराघरापर्यंत शिवसैनिकाच्या माध्यमातून केलेले काम  पोहचवण्याची जबाबदारी सर्व शिवसैनिकांनी पार पाडायची आहे. सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एकाच दिवशी 425 शाखांचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. त्या प्रत्येक शाखाप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी काळात झपाटून काम केली पाहिजे. जिल्ह्यातील शिवसैनिक पेटला तर तो काय करू शकतो, हे जिल्ह्याने पाहिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेची घोडदौड आणखी जोरदार सुरू राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, अतिवृष्टी काळात झालेल्या नुकसानग्रस्त भागातील कामे 15 दिवसाच्या आत पूर्ण केली आहेत. पाटण तालुक्यामध्ये 21 हजार 500 कुटुंबांना पहिल्या लॉकडाऊनमध्ये लोकांना दोन महिन्याचे घरपोच धान्य दिले. कोरोना काळातही गरजूंना मदत करण्यासाठी येथील प्रत्येक शिवसैनिक झटला आहे. तसेच या काळात पोलिस बांधवांनीही 18-18 तास काम केले आहे. या काळात जीव गमावलेल्या पोलीस बांधवांना आधार देण्याचे काम सरकारने केले आहे. शिवसेनेच्या जिल्हा, तालुका प्रमुखांनी विकास कांबळे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाटून दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी. तसेच विकासाचे काम करताना साधा शिवसैनिक डोळ्यासमोर ठेवा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे प्रत्येकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी सर्वांनी आपापल्या परीने योगदान द्यावे, असे आवाहन करून कराड नगरपालिकातेही चांगल्या प्रकारे काम करून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू, असा शब्दही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्री उदय सामंत यांना दिला.
जिल्हाध्यक्ष शेलार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून जिल्हाभरात अनेक विकास कामे झाले आहेत. तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी आतापर्यंत 750-800 कोटी रुपयांचा निधी आला आहे. ती विकास कामे शिवसैनिकांनी लोकांपर्यंत पोहोचवायला हवीत. केंद्र सरकारने करवाढीच्या रूपात लोकांवर अन्याय केला आहे. त्यांनी जनतेचे आधार कार्ड बनण्याऐवजी ते एटीएम कार्ड झाले आहेत. या परिस्थितीला लगाम घालण्यासाठी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागांवर भगवा फडकला पाहिजे. त्यानुसार सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागले पाहिजे, असे आवाहन करून जिल्ह्यात जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी प्रयत्न असल्याचे आश्वासन शेलार यांनी यावेळी मंत्री महोदयांना दिली.
दरम्यान, मंत्री उदय सामंत, शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत मोहसीन शेख, दिलीप मुठ्ठल, फिरोज मुल्ला, कृष्णात पवार, वामन कांबळे, तानाजी भोसले आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. तत्पूर्वी, पाटण तालुक्यातील शिवसेनेच्या गायकवाडवाडीच्या सरपंच रेशमा पवार व चिखलीचे कुलदीप क्षीरसागर यांचा मंत्री सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER