Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

फलटणला होणाऱ्या सामन्यांमध्ये कोणतीही कमतरता भासणार नाही : श्रीमंत रामराजे

राष्ट्रीय खो खो सामन्यांचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ संपन्न
टीम : धैर्य टाईम्स

फलटणला सर्व सोय नियोजन व्यवस्थित झाले आहे. फलटणला खो - खोची जी परंपरा आहे, ती संस्थान काळापासून आहे. येथे आलेल्या सर्वच खेळाडू, प्रशिक्षक व त्यांच्या समवेत आलेल्या सर्वांचे आभार मानत फलटणला होणाऱ्या सामन्यात कधीही कमतरता पडली नाही व आगामी काळात पडणार सुद्धा नाही, असे मत विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

फलटण येथील माजी आमदार स्व. श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर क्रीडांगणावर राष्ट्रीय खो-खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धांच्या बक्षीस वितरण व समारोप समारंभात विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी माजी सहकार मंत्री व विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण, राज्य क्रीडा महासंचालनालयाचे आयुक्त सुहास दिवसे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे, भारतीय खो-खो महासंघाचे महासचिव महेंद्रसिंग त्यागी, सहसचिव चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा ॲमॅच्युअर खो - खो असोसिएशनचे सचिव महेंद्र गाढवे, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

फलटण येथे पार पाडत असलेल्या राष्ट्रीय खो - खो स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे विशेष कौतुक करणे गरजेचे आहे. फलटणला खो - खो खेळाडूंसह इतर सर्वच टीम मेंबरची जी राहण्याची व भोजनाची जी सोय करण्यात आली आहे. ती अतिशय उत्कृष्ठ आहे. भविष्यात कोणतीही स्पर्धा असेल तर त्यामध्ये फलटणकर मागे राहणार नाहीत. सातारा जिल्ह्यामध्ये क्रीडा विभाग उत्तम रित्या कार्यरत आहे. त्यामध्ये फलटणला होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धा ह्या अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न झाल्या आहेत, असे मत माजी सहकार मंत्री व विद्यमान आमदार बाळसाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

फलटण सारख्या शहरात पाचव्यांदा खो - खोचे राष्ट्रीय सामने भरवले जात आहेत. त्यावरूनच फलटण व खो - खो हे वेगळे समीकरण आहे, हे दिसून येत आहे. भारतीय खो - खो महासंघाच्या वतीने जे पुरस्कार दिले जात आहे. ते अतिशय उल्लेखनीय आहे. क्रिकेट नंतर संपूर्ण देशामध्ये श्रीमंत असा खेळ म्हणजे खो - खो आहे. खो - खो व कुस्तीने राज्याला उत्कृष्ठ असे खेळाडू दिले आहेत. आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही खो - खो, कुस्तीचा नवा आराखडा तयार करत आहे. या आराखड्यात या खेळांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. क्रीडा खेळात खेळाडूं बरोबर प्रशिक्षक यांचे योगदान महत्वाचे आहे. प्रशिक्षक यांच्या प्रशिक्षणासाठी आपण सदैव तत्पर आहोत. येणाऱ्या काळात कधीही आपल्यातील प्रशिक्षक यांना उत्तम शिक्षण देण्यात येईल. क्रीडा महासंचनालय यांच्या वतीने सर्व सहकार्य येणाऱ्या काळात खो - खो खेळाडूंना राहील असा विश्वास यावेळी महाराष्ट्र क्रीडा महासंचनालयाचे आयुक्त सुहास दिवसे यांनी दिला.

फलटणला सुंदर वातावरणामध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व खेळाडू यांना राहण्याची, खाण्याची व इतर व्यवस्था उत्तम आहे. आज अंतिम सामन्यासाठी जी गर्दी झालेली आहे. त्यातील प्रत्येक जण इथे असलेल्या खेळाडूला आशीर्वाद देवूनच पुढे जात आहे. ह्या खेळाडूंना आपण सर्वांनी येवून एक नवीन दिशा दिलेली आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांचे योगदान आहे, ते उल्लेखनीय आहे. फलटणला झालेले सामने हे खेळाडू कधीही विसरणार नाही. फलटणचे असलेले उत्तम नियोजन हे आयोजन कर्त्यांचे यश आहे, असे मत भारतीय खो - खो महासंघाचे महासचिव महेंद्रसिंग त्यागी यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र खो - खो असोसिशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण येथे खो - खो अतिशय नियोजनबध्द पद्धतीने पार पडला आहे. कोणत्याही व्यवस्थेमध्ये कमतरता फलटणला कोणालाही जाणवली नाही. फलटणची व खो - खो ची नाळ एका वेगळ्या पद्धतीने जोडली गेली आहे. आता आगमी काळामध्ये खो - खो खेळ आंतरराषट्रीय खेळाला जाईल. तेंव्हा सुद्धा त्यामध्ये फलटणचे नाव निघाल्याशिवाय राहणार नाही. क्रिकेट नंतर देशातील सर्वात श्रीमंत म्हणून भारतीय खो - खो महासंघाचे ओळख आहे, असेही यावेळी भारतीय खो - खो महासंघाचे सहसचिव चंद्रजीत जाधव यांनी स्पष्ट केले. 

राष्ट्रीय खो - खो स्पर्धेसाठी सर्वांचे सहकार्य लाभले आहे. फलटणला अनेक खो - खोचे खेळाडू लाभले आहेत. फलटण व खो - खो हे एक समीकरण तयार झाले आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. फलटणसह जिल्हा व राज्य स्थरातील सर्वच अधिकारी व पदाधिकारी यांनी सुद्धा सहकार्य केलेले आहे. भारतीय खो - खो महासंघाचे फलटण मध्ये झालेल्या स्पर्धांमधील खेळाडूंना मोठे सहकार्य केलेले आहे, त्यांचे विशेष आभार यावेळी महाराष्ट्र खो - खो असोसिएनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र खो - खो असोसिशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व आभार सचिव ॲड. गोविंद शर्मा यांनी व्यक्त केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER