Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार

मी संघर्षातूनच वर आलो आहे, संघर्ष मला नवीन नाही

आ. शिवेंद्रसिंहराजे; भूलथापांना न भूलण्याचे मतदारांना केले आवाहन
टीम : धैर्य टाईम्स
I have come out of the struggle, the struggle is not new to me
देशातील एक आदर्श बँक असा नावलौकिक असलेल्या बँकेवर संचालकपदाच्या हव्यासापोटी तथ्यहीन आणि बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. सवंग लोकप्रियतेसाठी बँकेवर आरोप करणाऱ्यांच्या फसवेगिरीला मतदार थारा देणार नाहीत. मी संघर्षातून वर आलो आहे. संघर्ष मला नवीन नाही.

सातारा : देशातील एक आदर्श बँक असा नावलौकिक असलेल्या बँकेवर संचालकपदाच्या हव्यासापोटी तथ्यहीन आणि बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. सवंग लोकप्रियतेसाठी बँकेवर आरोप करणाऱ्यांच्या फसवेगिरीला मतदार थारा देणार नाहीत. मी संघर्षातून वर आलो आहे. संघर्ष मला नवीन नाही. त्यामुळे कोणी काहीही करू द्या, कोणाला घाबरायचं काहीही कारण नाही. मी कायम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा शब्द जिल्हा बँकेचे चेअरमन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मतदारांना दिला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनिमित्त शेंद्रे येथील स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथे आयोजित बँकेच्या सातारा तालुक्यातील मतदार मेळाव्यात आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी शिक्षण सभापती सतीश चव्हाण, माजी सदस्य राजू भोसले, विद्यमान सदस्य प्रतीक कदम, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बडेकर, कांचन साळुंखे, अनिल देसाई, माजी उपाध्यक्ष रविंद्र कदम, सातारा नगर पालिकेचे नगरसेवक अशोक मोने, अमोल मोहिते, अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण, जयवंत भोसले, लीना गोरे, सोनाली नलावडे, दीपलक्ष्मी नाईक, कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, उपाध्यक्ष विश्वास शेडगे, सर्व संचालक, रामभाऊ जगदाळे, लालासाहेब पवार, पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर, सदस्य जितेंद्र सावंत, राहुल शिंदे, दयानंद उघडे, गणपत शिंदे, उत्तमराव नावडकर यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आपला स्वार्थ साध्य होत नसल्याचे दिसताच रेटून खोटं बोलायचं आणि चांगल्या संस्थेची बदनामी करायची, लोकांची आणि मतदारांची दिशाभूल करायची हा प्रकार सध्या जोमात सुरु आहे. त्याने काहीही साध्य होणार नाही उलट मतदार आणि जिल्हावासियांचे मनोरंजनच होत आहे. राज्य आणि देशपातळीवर नावाजलेल्या जिल्हा बँकेबाबत अपुऱ्या माहीच्या आधारे कोणी तथ्यहीन आरोप करत असेल तर त्या बँकेचा चेअरमन म्हणून त्या आरोपांचे खंडण करणे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे हे माझे कर्तव्यच आहे. बँकेचा इतिहास पाहता बँकेचे कामकाज राजकारणविरहित चालले आहे. ही निवडणूक सुद्धा पक्षविरहित होणार आहे. त्यामुळे जे बँकेच्या प्रगतीसाठी, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी एकविचाराने काम करतात त्याच उमेदवारांना आणि त्यांच्या संपूर्ण पॅनेलला निवडून देणे ही आपली जबाबदारी आहे.
गेले पाच- सहा वर्ष चेअरमन म्हणून काम करताना बँकेची आर्थिक स्थिती आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न मी केला आहे. बँकेच्या भागभांडवल, कर्जपुरवठा, ठेवी आदी सर्व बाबींमध्ये तीनपट वाढ झाली आहे. राज्यातीलच नव्हे तर देशातील इतर बँकांचे अधिकारी, पदाधिकारी आपल्या बँकेचे कामकाज पाहण्यासाठी येतात. नाबार्ड, रिझर्व बँक, ऑडिटर आदी कोणीही कोणताही आक्षेप बँकेच्या कामकाजावर कधीही घेतला नाही. असे असताना उगाच राजकीय स्वार्थासाठी एका आदर्श संस्थेची बदनामी करणे मुळीच योग्य नाही. त्यामुळे बँकेसाठी कोणी योगदान दिले आणि कोण योग्य आहे याचा विचार करून मतदारांनी मतदान केले पाहिजे.
स्व.भाऊसाहेब महाराजांनी तालुक्यात विविध सहकारी संस्थांची उभारणी केली आणि त्या नोंदणीकृत संस्था आता बँकेच्या मतदार आहेत. भाऊसाहेब महाराजांनंतर मी तुमच्या पाठबळावर संघर्षातूनच पुढे आलो आहे. त्यामुळे संघर्ष मला नवीन नाही, याची जाणीव संबंधितांनी ठेवावी. मतदारांनी कोणालाही घाबरायचे कारण नाही. काहीही असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधा, मी कायम तुमच्या पाठीशी आहे. मी व माझ्या सहकारी नेत्यांकडून जे पॅनल निश्चित होईल त्यालाच सर्वांनी साथ द्यावी आणि आपल्याच उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.
राजू भोसले यांनी सूत्रसंचालन व स्वागत केले. सतीश चव्हाण, चंद्रकांत जाधव यांनी मनोगत केले. मेळाव्याला बँकेच्या सातारा तालुक्यातील विकाससेवा सोसायटी, खरेदी विक्री संघ, कृषी उत्पादन प्रक्रिया, नागरी बँका/ नागरी पतसंस्था, गृहनिर्माण व दूध उत्पादक संस्था, औद्योगिक विणकर व मजूर ग्राहक संस्था/ पाणीपुरवठा संस्था मतदारसंघातील सर्व मतदार उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER