Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

फलटणच्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास : रस्त्यावरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा

टीम : धैर्य टाईम्स


फलटण :- गेल्या अनेक वर्षापासून फलटण शहरातील विविध रस्त्यांवर अतिक्रमण बोकाळले होते. मात्र आज फलटण नगरपालिकेच्या प्रशासनाने रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केल्याने फलटणचा रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. वाहतुकीस अडथळे ठरणारे हे अतिक्रमणे नगरपालिका प्रशासनाने मोठ्या पोलीस बंदोबस्तासह काढण्यास सुरुवात केली आहे. 

रस्त्यावरील अतिक्रमणे निघत असल्याने फलटणकराने पालिकेला धन्यवाद दिले आहेत. अनेक व्यापारांनी चक्क रस्त्याच्या मधोमध जाहिरातींचे फलक लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता. तर अनेक व्यावसायिक संकुलासमोरील पार्किंगमध्येच जाहिरातींचे बॅनर लावल्याने पार्किंग व्यवस्था अस्तव्यस्त झाली होती. आजच्या या कारवाईने शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुना डी.एड.चौक, यासह विविध भागातील रस्त्यावरील अतिक्रमणे काढल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्याची शक्यता आहे.

फलटण तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी डॉ अभिजीत जाधव यांचे अध्यक्षतेखाली दिनांक २८/११/२०२४ रोजी पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १७९ मधील नमूद तरतूदी

नुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानूसार फलटण शहरातील सर्व मुख्य चौकामध्ये, मुख्य रस्त्यावर तसेच अंतर्गत रस्त्यांवर दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या उद्भवण्याचे प्रमाण वाढले होते. फलटण शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये साखर कारखाने तसेच लहान-मोठे उद्योग मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ट्रक, ऊसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर तसेच इतर अवजड वाहनाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत होती.यापूर्वी पार पडलेल्या बैठकीमध्ये फलटण शहरातील वाहतूक समस्येची कोंडी कमी करण्यासाठी मुख्याधिकारी, फलटण नगरपरिषद व पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस स्टेशन यांना संयुक्त पणे उपायोजना करण्याचा निर्णय झाला होता.

त्यानूसार शहरातील सार्वजनिक रस्त्याच्या पृष्ठभागावरील प्रक्षपणे, अडथळे व अतिक्रमणे झाली असल्याने मुख्याधिकारी यांचे लेखी परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही सार्वजनिक रस्त्यावर केलेले कोणतेही प्रक्षेपण, अतिक्रमण किवा अडथळा कोणतीही नोटीस न देता काढून टाकण्याचा अधिकार मुख्याधिकारी यांना असल्याने मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दोन पथकांची नेमणूक करत अतिक्रमण विरोधी कारवाई करता आदेश जारी केली होते. आज सकाळी या अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेस सुरुवात झाली आहे.


किरकोळ बाचाबाचीचे प्रकार 


 शहरातील व्यावसायिक संकुलासमोरील अतिक्रमण व्यावसायिक जाहिरातीचे फलक व अनधिकृत हातगाडी काढत असताना अतिक्रमण धारक अनेक व्यवसायिकांनी अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शविल्याने किरकोळ बाचाबाचीचे प्रकार झाले मात्र नगरपालिका आपल्या निर्णयावर ठाम राहील्याने व पोलिसांच्या मदतीने किरकोळ वाद मिटवण्यात आले. 


 शहरातील धनदांडग्यांवर कारवाई होणार का?


 फलटण नगरपालिका प्रशासनाने आज शहरातील रस्त्यांवर अतिक्रमे काढण्यास सुरुवात केल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत असतानाच, फलटण शहरातील अनेक अतिक्रमणे ही धनदांडग्यांची आहेत त्यांच्यावर नगरपालिका प्रशासन कारवाई करणार का अशी चर्चा सध्या फलटण शहरात सुरू आहे. 


 तक्रारी असलेल्या सर्व अतिक्रमणांवर कारवाई होणार - मुख्याधिकारी निखिल मोरे 


 सध्या फलटण शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. त्यानंतर तक्रारी असणारी अतिक्रमणे ही काढली जाणार असल्याची माहिती फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER