Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

प्रतापगडावर 10 नोव्हेंबरला कुलकर्णी व खान वध दिन

टेक्सास गायकवाड यांची माहिती : भारतीय रक्षक आघाडी आयोजक
टीम : धैर्य टाईम्स
Kulkarni and Khan massacre on November 10 at Pratapgad
शिवरायांच्या ऐतिहासिक कार्याचा मानबिंदू असलेली घटना असून बुधवार दि. 10 रोजी प्रतापगडावर भारतीय रक्षक आघाडीतर्फे कृष्णा भास्कर कुलकर्णी व अफझल खान वध दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आघाडीचे संस्थापक टेक्सास गायकवाड यांनी दिली.

सातारा : प्रतापगडावरील ऐतिहासिक अफझलखान भेटीप्रसंगी दगाबाजी करणाऱ्या अफझलखानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनख्यांचा वार करुन बाहेर काढला. त्याचवेळी बेसावध छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर तलवारीने वार करणारा शिवद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णी हा दगाबाज निघाला. मात्र, महाराजांनी कुलकर्णींचे खांडोळे केले. हा दिवस 10 नोव्हेंबर 1659 होता. शिवरायांच्या ऐतिहासिक कार्याचा मानबिंदू असलेली घटना असून बुधवार दि. 10 रोजी प्रतापगडावर भारतीय रक्षक आघाडीतर्फे कृष्णा भास्कर कुलकर्णी व अफझल खान वध दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आघाडीचे संस्थापक टेक्सास गायकवाड यांनी दिली.  
यासाठी साताऱ्यातील विश्रामगृहात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी भारतीय रक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक गायकवाड, सरचिटणीस अमर गायकवाड तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
टेक्सास गायकवाड यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांना ठार करण्याच्या उद्देशाने आलेल्या अफझलखानाचा कोथळा महाराजांनी बाहेर काढला. अफझलखान शामियान्याच्या बाहेर दगा-दगा ओरडत बाहेर आला. त्यावेळी हिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर हिंदू असलेल्या कृष्णा भास्कर कुलकर्णी यांनी डोक्यावर तलवारीचा वार केला. मात्र महाराजांनी कुलकर्णीची खांडोळी करुन टाकली.
जर त्याक्षणी खरंच कृष्णा कुलकर्णीला मारल्यावर ब्रम्हहत्या घडते का ? याला मारावे की सोडावे ? अशा विचारात छत्रपती शिवाजी महाराज गढून गेले असते तर कुलकर्णीने महाराजांचा जीव घेतला असता. मग छत्रपती शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न साकार झाले असते का? भारतीय इतिहासात शौयाची, स्वाभिमानाची, स्वराज्याची गौरवास्पद म्हणून ओळखली जाणारी मराठेशाही अस्तित्वात आली असती का ? असा सवाल करत टेक्सास गायकवाड म्हणाले, म्हणूनच कुलकर्णीचा झालेला वध हा शिवरायांच्या ऐतिहासिक कार्याचा मानबिंदू ठरतो.  
अफझलखान वधावरुन हिंदू-मुस्लिमांमध्ये विषाची बिजे पेरणाऱयांपासून सावध राहून अशांत भारताला धार्मिक दंगलीतुन मुक्त करण्यासाठी व प्रगतीशील मार्गावर नेण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठीच 10 नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या कृष्णा भास्कर कुलकर्णी वध दिन हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्यदिन म्हणून साजरा करण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन गायकवाड यांनी केले.

माध्यम प्रतिनिधींकडून आक्षेप  
पत्रकार परिषदेत मुख्य विषय होता कृष्णा कुलकर्णी वध दिन. मात्र, हे टेक्सास गायकवाड सांगत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी शामियान्यात अफझलखानाला जखमी केले व तो बाहेर आला असा उल्लेख केला तसेच शासनाने शिवप्रताप दिन साजरा करु नये, त्याऐवजी कृष्णा कुलकर्णी वध दिन साजरा करावा, असे सांगितले. त्यावर माध्यम प्रतिनिधींनी त्यांना रोखले. तुम्ही तुमची माहिती द्या पण ही चुकीची मागणी असल्याचे सांगितले. त्यावर मग अफझलखानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी मारला हे का नाकारताय? असाही सवाल उपस्थित केला गेला. त्यावेळी गायकवाड व माध्यम प्रतिनिधींमध्ये तणातणी झाली.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER