Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

‘व्‍होट फ्रॉम होम’ सुविधेमुळे १०३ वर्षाच्या मतदार आजीनी मतदानाचा हक्क बजावला 

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनीधी:- आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच ८० पेक्षा जास्त वय असणारे आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक विकलांग असणाऱ्या नागरिकांना घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 

कोळकी तालुका फलटण येथील तब्बल १०३ वर्षाच्या मतदार आजीबाई श्रीमती कस्तुरबाई पुलचंद दोशी यांनी मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावला भारत निवडणूक आयोगाने यावर्षी ८५ वर्षांच्यावर वय असलेल्या व दिव्यांग मतदार यांचे मतदान पथकाने घरी जाऊन मतदान करून घेण्याची सुविधा यावेळी प्रथमच उपलब्ध करून दिलेली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघामधील फलटण (अ.जा.) विधानसभा मतदारसंघांमध्ये या मतदान पथकामार्फत मतदान करून घेण्याची कार्यवाही दिनांक २६ एप्रिल ते दिनांक २९ एप्रिल अखेर चालणार आहे. यासाठी फलटण विधानसभा मतदारसंघांमध्ये दहा स्वतंत्र मतदान पथके तयार करण्यात आलेली असून प्रत्येक पथकामध्ये दोन मतदान अधिकारी एक व्हिडिओ ग्राफर, एक पोलीस कर्मचारी तसेच एक सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश आहे.

गेल्या महिन्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेमार्फत मतदारांचे अर्ज भरून घेण्यात आले असून ज्या मतदारांनी गृहभेटीद्वारे मतदानाचा पर्याय स्वीकारला आहे त्यांचे घरी भेट देण्यात येत आहे. गृहभेटीद्वारे मतदान हा केवळ एक पर्याय असून अशा कोणत्याही मतदारास त्याची शारीरिक परिस्थिती चांगली असून इच्छाशक्ती असल्यास मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येते. परंतु एकदा गृहभेटीद्वारे मतदानाचा पर्याय स्वीकारल्यास त्या मतदारास कोणत्याही परिस्थितीत मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येणार नाही. त्यामुळे जे वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदार अतिशय दुर्बल किंवा अंथरुणास खिळून आहेत आणि मतदान केंद्रावर अजिबात जाऊ शकत नाहीत त्यांनीच हा पर्याय स्वीकारावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेले होते. त्यास अनुसरून फलटण विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ३८७ वयोवृद्ध (८५ वर्षावरील) आणि ६८ दिव्यांग अशा एकूण ४५५ उमेदवारांनी गृहभेटीद्वारे मतदानाचा पर्याय स्वीकारला आहे. 

सर्व मतदारांना गृहभेटीचा दिनांक आणि वेळ बीएलओ मार्फत तसेच दूरध्वनीद्वारे आगाऊ कळवला जातो. काही कारणास्तव सदर मतदार त्यावेळी घरी उपस्थित नसल्यास त्याला पूर्वकल्पना देऊन आणखी एक वेळेस त्याच्या घरी भेट दिली जाते. परंतु दुसऱ्या वेळेसही सदर मतदार घरी अनुपस्थित असल्यास पुन्हा कोणतीही भेट दिली जात नाही. एकदा गृह भेटीद्वारे मतदानाचा पर्याय निवडला की कोणत्याही परिस्थितीत त्या मतदारास मतदान केंद्रावर जाऊन आपले मतदान करता येत नाही.

भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेली ही सुविधा खरोखरच किती उत्तम आहे याची प्रचिती आज फलटण शहरामध्ये श्रीमती कस्तुरबाई पुलचंद जोशी या १०३ वर्षाच्या अंथरुणाला खिळून असलेल्या आजींनी गृहभेटीद्वारे मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात आपला सहभाग नोंदविला. त्यांचा आदर्श समोर ठेवून फलटण विधानसभा मतदारसंघातील सर्वच मतदारांनी दिनांक ७ मे रोजी होणाऱ्या मतदानामध्ये आपला सहभाग नोंदवून १०० टक्के मतदान करावे असे आवाहन प्रशासनातर्फे सर्व मतदारांना करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER