Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

ताथवडा घाटात लुटमार करणारी टोळी जेरबंद

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी:- फलटण ग्रामीण पोलिसांनी ताथवडा घाटात लुटमार करणारी पाच जणांची टोळी जेरबंद केली असून लूटमारीचे दोन गुन्ह्यांची उकल ग्रामीण पोलिसांनी केली आहे.

फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १६ रोजी ४.३० वाजण्याच्या सुमाराला कुरियर सप्लाय करणारा ऋषिकेश अनिल मिसाळ (रा. कोळकी, ता. फलटण) हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुसेगाव-फलटण रोडवरील मानेवाडी बसस्टॉपवर कुरियर पार्सल देण्यासाठी ग्राहकाची वाट पाहत थांबला असताना फलटण बाजुकडुन दोन मोटार सायकलीवरून आलेल्या सहा लोकांनी त्याचेजवळ जाऊन तो वाटत पाहत असलेला ग्राहक असल्याचा बहाणा करून त्यास "पार्सल आहे का ?" असे बळजबरीने विचारले. त्यावेळी त्यांच्यापैकी एकाने ऋषिकेश अनिल मिसाळ यास गाडीवरुन खाली पाडल्यानंतर दुस-याने त्याचे डोक्यात दगड मारून जखमी केले. त्याचवेळी इत्तर चौघांनी त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याचेकडील रोख १० रुपये व १५ हजार रूपयांचा मोबाईल हॅण्डसेट व विविध पार्सल असलेल्या एकुण २७ हजार रुपये किंमतीच्या वस्तु असा एकुण ५२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल असणारी बॅग जबरदस्तीने घेऊन त्याला मारहाण करुन ताथवडा घाटाकडे मोटार सायकलवरून पळून गेले. सदर घटनेबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

फलटण ग्रामीण पोलिसांनी पुसेगाव रोडवरील सर्व हॉटेल, पेट्रोलपंप व इतर दुकानांचे सी. सी. टी. व्ही. कॅमेरे चेक केले. मानेवाडी भागातील गावांमध्ये जाऊन फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनाच्या व्यक्तींची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एके ठिकाणी शेतात काम करणा-या शेतक-याने फिर्यादी सांगत असलेल्या वर्णनाचे लोक बिबी बाजुकडे गेल्याचे सांगितले. या त्रोटक माहितीच्या आधारे पोलिसांनी बिबी व पंचक्रोशीतील सर्व परिसर पिंजुन काढुन आरोपींची नावे निष्पन्न करून १. अजय संभाजी मदने (वय २१ वर्ष, रा. डिस्कळ ता. खटाव) २. अक्षय संभाजी जाधव (वय - २७ वर्ष, रा. मोळ, ता. खटाव) ३ निखील उमाजी बुधावले (वय २१ वर्ष, रा. बुधावलेवाडी, ता. खटाव) ४. आदित्य रामदास शिरतोडे (वय १९ वर्ष, रा. ललगुण, ता. खटाव) ५. आकाश प्रभाकर जाधव (वय- २२ वर्ष, रा. कोरेगाव ता. कोरेगाव) यांना मोळ, ता. खटाव येथील एका डोंग-याच्या पायथ्याखालून व नेर येथील धरणाचे भराव्याजवळुन पाठलाग करून २४ तासांचे आत ताब्यात घेऊन अटक करुन त्यांच्याकडुन दोन मोटार सायकलीसह एकुण २ लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरील आरोपीना न्यायालयामध्ये हजर केले असता दि. २१/१०/२०२३ रोजी पर्यंत पोलिस कोठडी मंजुर करण्यात आली आहे. वरील गुन्हेगार हे ताथवडाघाटात छोट्यामोठ्या चो-या सतत करत होते. सदर आरोपीं पैकी अजय संभाजी मदने व निखील उमाजी बुधावले यांनी दि. १३/१०/२०२३ रोजी वाखरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे पेट्रोलपंपावरील कामगाराला तलवारीचा धाक दाखवुन त्याचेकडील रोख रक्कम चोरुन नेल्याचे निष्पन्न झाले आहे. 

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आँचल दलाल, व उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शन व सुचनांनुसार फलटण ग्रामीण पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक सुनिल महाडीक यांचे नेतृत्वाखाली पो. उ. नि. सागर अरगडे, पो. उ. नि. प्रमोद दिक्षित, पो. उ. नि. पाटील, पोलिस अमलदार योगेश रणपिसे, नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, विक्रांत बनकर, हनुमंत दडस, श्रीकांत खरात, विक्रम कुंभार, तुषार नलवडे या पोलिस अधिकारी व अमलदारांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER